कर्नाटकमध्ये व्याजमुक्त कर्ज, मोफत सिलेंडर, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?

mopht silender

कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे प्रचाराचा धुराळा सुरू आहे. यामध्ये लोकांना आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे.

आता भाजपने जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या आहेत. भाजपने आपले व्हिजन डॉक्युमेंट जारी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन केले. भाजपने या जाहीरनाम्याला ‘प्रजा ध्वनी’ असे नाव दिले आहे.

भाजपच्या या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपचे बेंगळुरू येथील पक्षाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला.

जाहीरनाम्यात कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. शेतकरी विमा, मोफत सिलेंडर बियाणे खरेदीसाठी 10 हजारांची मदत करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन निधी. शहरातील 5 लाख गरिबांना घरे, तर ग्रामीण भागातील 10 लाख गरिबांना घरे देण्याचे आश्वासन दिले आहे.

सर्व वॉर्डात अटल आहार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध दिले जाणार आहे. 10 किलो तांदूळ दिला जाईल. तसेच दलित, आदिवासी महिलांसाठी एक ओबवा सामाजिक न्याय निधी योजनेचे आश्वासन दिले आहे.

source:- krishijagran

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *