गाय-म्हैस खरेदी करताय ? तर मिळवा 80 हजाराचे अनुदान

cow & bafelo

राज्य सरकारने दुधाळ गायी व म्हशींच्या गटांच्या वितरणासाठी राज्यातील दुग्धोत्पादनात वाढ होण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी अनुदान जाहीर केले आहे.
सर्वसाधारण वर्गासाठी ५० % तसेच आदिवासी क्षेत्र, अनुसूचित जाती, जमाती साठी ५०% ते ७५% अनुदानावर जनावरांचे गट वितरित करण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यासाठी मराठवाडा पॅकेजअंतर्गत दोन हजार गट देण्यात येतील.

परंतु या योजने मार्फत एक ते दोन महिने व्यालेली जनावरे खरेदी करावी लागतील.ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची ती असावीत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल . निवड समिती ही त्यातील लाभार्थींची निवड करेल.

या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने आहे. या योजनेत ३० टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येईल 
समितीमार्फत लाभार्थी निवडण्यात येतील. प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी पुढील पाच वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

जालन्यात दुधाळ जनावरे योजना

मराठवाडा पॅकेजमार्फत दुधाळ जनावरे हि योजना जालना जिल्ह्यात राबविण्यात येईल. संकरित गायी किंवा अंतर्गत दोन देशी व एका गटात दोन म्हशीं असे अनुदानास पात्र असेल.देशी संकरित प्रतिगाय किंवा देशी गाय सत्तर हजार तसेच म्हैस अंशी हजार खरेदी केल्यास किंवा दुसऱ्या राज्यांतून खरेदी केल्यास त्याचा येणारा वाहतूक खर्च प्रतिम्हैस, गाय, दहा हजार देण्यात येईल . एकूण खर्च म्हशींसाठी १ लाख ७० हजार व गाईसाठी १ लाख ५० हजार असा अपेक्षित असेल .या ९ हजार ६२९ रुपये म्हशींसाठी आणि ८ हजार ४२५ रुपये गाई साठी तीन वर्षांसाठी विमा खर्च देण्यात येईल. या खर्चाच्या अनुदान हे ५० % देण्यात येईल.

अनुसूचित जाती, जमातींसाठी ७५ टक्के अनुदान

म्हशींसाठी १ लाख ३४ हजार, ४४३ रुपयांचे आणि गायींसाठी १ लाख १७ हजार अनुदान मिळेल. २५ टक्के बँकेच्या कर्जातून व पाच टक्के स्वत: ही रक्कम उभारावी लागेल.
७५ टक्के अनुदानावर अनुसूचित जाती, जमातींसाठी संकरित गायी किंवा दोन दुधाळ आणि दोन म्हशींचा एक गट देण्यात येईल. हे अनुदान जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मिळेल.म्हशींच्या गटासाठी १ लाख २० हजार तर गायींच्या एका गटासाठी १ लाख ५ हजार व विमा अनुक्रमे १२ हजार ६३८ व १४ हजार ४४३ असा राहील.

सर्वसाधारण गटासाठी ५० अनुदान

५० टक्के अनुदानावर गाईंसाठी ७८ हजार ४२५, तर म्हशींसाठी ८९ हजार ६२९, तर ७५ टक्के अनुदानावर गाईंसाठी १ लाख १७ हजार ६३८ व म्हशींसाठी १ लाख ३४ हजार ४४३ रुपये देण्यात येतील.
सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना दोन देशी किंवा संकरित गायी व दोन म्हशींचा गट ५० टक्के, तर अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदान मिळेल.

सुधारित जातींची जनावरे देणार

दुधाळ जनावरे ही शक्यतो १ ते २ महिन्यांपूर्वी व्यालेली व दुसऱ्या व तिसऱ्या वेताची असावीत
प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या एचएफ, जर्सी संकरित गायी व प्रतिदिन आठ ते १० लिटर दूध देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपाकर, प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी, तसेच मुऱ्हा व जाफराबादी या सुधारित जातींच्या म्हशी देण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *