पारंपरिक लसणापेक्षा या गुलाबी लसणाची उत्पादक क्षमता जास्त आहे . तसेच याच्यामध्ये औषधी गुणधर्म देखील भरपूर प्रमाणात आहेत .अँटिऑक्साइड व सल्फर याची गुणवत्ता चांगली आहे.
आपल्या भारतामध्ये लसणाची शेती खूप प्रमाणात वर केली जाते दररोज लसणाचे सेवन केल्याने आरोग्य हे निरोगी राहते. लसणामध्ये मॅगनीज ,कॅल्शियम, फॉस्फरस ,जस्त ,विटामिन बी ६, आयर्न ,विटामिन सी याचे प्रमाण असते. या व्यतिरिक्त कार्बन डाय-ऑक्साइड , पॅथॉनिक प्रोटीन ,थियामीनही लसणात असते. तसेच गुलाबी लसणाची एक नवीन जात बिहारच्या कृषी विद्यापीठ सबौरने विकसित केलेली आहे . लवकरच तुम्हाला गुलाबी लसणाचा स्वाद घेता येणार आहे.
गुलाबी लसणामध्ये अँटिऑक्सिडेंटची गुणवत्ता चांगली
पारंपरिक लसणापेक्षा गुलाबी लसणाची उत्पादक क्षमता जास्त असते . त्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधीय गुणधर्म देखील आहेत गुलाबी लसणामध्ये अँटिऑक्साइड तसेच सल्फरचे प्रमाणही चांगले आहे. गुलाबी लसूण हा पांढऱ्या लसणापेक्षा जास्त कालावधीपर्यंत घरी ठेवला जातो याशिवाय पोटॅशियम व न्यूट्रीशन अधिक प्रमाणात यामध्ये आहे.
हा लसूण लवकर खराब देखील होत नाही.
संशोधन टीम संगीता यांच्या मते गुलाबी लसणासाठीचे काम गेले ९ वर्षापासून सुरू होते व त्यावर यश आलेले आहे. पांढऱ्या लसणापेक्षा गुलाबी लसणाच्या कव्हर ची जाडी जास्त आहे, त्यामुळे हा लसूण लवकर खराब होत नाही.
शेतकरी करणार आता गुलाबी लसणाची शेती
संशोधकांचे बिहार सरकारशी गुलाबी लसणाबाबत बोलणे झाले असून ही प्रजाती शेतीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. यानंतर गुलाबी लसणाची शेतकरी शेती करू शकतात. याचे बीज शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध करून दिले जाईल.
सल्फर आणि फास्फरसची चाचणी सबौर विद्यापीठात करण्यात आली आहे. हे घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. पांढऱ्या लसणापेक्षा गुलाब लसणात रोगप्रतिकारकशक्ती जास्त असते. गुलाबी लसणाला सहसा रोग होत नाही.त्यामुळे फवारणीचा देखील खर्च वाचतो .