पेरणीच्या हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करून फसवणूक करतात. ही फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे .यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षाची शिक्षा होणार असून, त्यासाठी अधिवेशनामध्ये कायदा आणण्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे.
कृषिमंत्री सत्तार यांनी अकोल्या मधील दैनंदिन लोकमत रोप्य महोत्सव च्या कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी ही घोषणा केली बोलत असताना ते म्हणाले की ज्यांच्याकडे बोगस बियाणे ,खते, औषधे, असतील तर ती लवकरच नष्ट करावीत अन्यथा बोगस माल विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यांना दहा वर्षाची शिक्षा झालीच पाहिजे असा कायदा अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सतार यांनी सांगितलेले आहे.
सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक दिवस बळीराजांसाठी एक उपक्रम राबवला होता . ज्यामध्ये 16000 शासकीय कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या तसेच ते सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याचा अभ्यास देखील त्यांनी केला.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगामाचा आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये अकोला परभणी, जालना या जिल्ह्यामधील काही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी 87 ठिकाणी छापेमारी केली तसेच त्यातून 68 ठिकाणी अनियमितता आढळून आली. काही ठिकाणी सरकारचे अधिकारी पैसे घेत असल्याच्या बातम्या समोर आल्या तसेच पोलिसांना कारवाईत सहभागी होण्याचा सूचना दिल्या , कोणत्या अधिकाऱ्यांनी जर पैसे घेतले चार होऊन आल्यास त्यांची तक्रार ही जिल्हाधिकारी किंवा एस पी कडे करावी असे सतार यांनी स्पष्ट केले