काही दिवसापूर्वी लसणाचा दर प्रति किलो 90 रुपये 120 रुपये होता. परंतु आता मात्र 110 ते 150 रुपयांवर त्याची किंमत गेली असून पुढील काळामध्ये लसणाचा दर हा 200 रुपये पार करून जाईल अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे .
त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जानेवारी, फेब्रुवारी मध्ये नवीन लसूण येण्यास सुरुवात होते त्यामुळे नवीन लसूण बाजारात येताच दर कमी होतात. परंतु यंदा लागवडीसाठी क्षेत्र हे कमी असल्यामुळे उत्पादनही कमी झालेले आहेत . त्यामुळे लसणाच्या किमती वाढलेले आहेत.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लसूण दर पुन्हा वाढ झालेली आहे . लसणाची एप्रिल पासून आवक घटली असून लसणाच्या किमती वाढल्या आहेत. या कालावधीमध्ये गेल्या आठवड्यात घाऊक बाजारामध्ये 90 ते 120 रुपये किलो दराने लसूण उपलब्ध होतात परंतु या आठवड्यामध्ये लसणाच्या दरात वीस ते तीस रुपये वाढ झाली असून आता त्याचा दर 110 ते 150 रुपयांवर गेलेला असून दोनशे रुपये पर्यंत त्याची वाटचाल जाण्याची शक्यता आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. प्रति किलो 200 ते 250 रुपयांवर दर गेले होते. आता देखील पुढील काळामध्ये लसूण 200 पार करणार असा अंदाज आहे. याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.