लोकर उत्पादनासाठी मेंढीपालन लोक करत असतात .परंतु दरामध्ये सतत घट होत चालल्यामुळे मास उत्पादनाच्या दृष्टीने नव्या जातींची मागणी मेंढी पालक करत होते. त्यामुळे राजस्थान मधील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेने अधिक मास आणि पिल्ले देणाऱ्या जातींचा विकास करण्यावर भर दिला.
भारतातील मेंढी पालकांना संशोधनाचा आधार देण्याच्या उद्देशाने 1962 साली राजस्थान मधील अविकानगर येथे कृषी संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र ची स्थापना करण्यात आली होती. मेंढीचे दूध मास ,लोकर या उत्पादनात वाढ करणे. याबाबत ही संस्था काम करते. मेंढीमध्ये 70 ते 80 टक्के मास असते 20 टक्के लोकर असते. व अन्य घटक पाच ते सात टक्के असतात .या केंद्रामध्ये 1976 पासून सिरोही शेळीवर संशोधन सुरू आहे .देशांमध्ये दक्षिण भारतात मेंढी पालन अधिक होत असते या केंद्राचे संचालक डॉक्टर अरुण कुमार यांनी सांगितले.
या काळामध्ये लोकरची मागणी कमी झालेली आहे
चीन मधून येणारा कृत्रिम धागा व कापड निर्मितीतील अन्य स्वस्त साहित्य यामुळे लोकरची मागणी कमी झालेली आहे. आरोग्याला फायदेशीर असून देखील लोकरचे दरामध्ये त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे .केवळ लोकरीसाठी मेंढीपालन करणे आता तितके फायद्याचे राहिलेले नाही त्यामुळे मांस उत्पादनासाठी मेंढीच्या योग्य त्या जातींचा विकास यासाठी ही संस्था प्रयत्न करत असते . व या संस्थेने आपल्या संशोधन धोरणामध्ये वेळचे वेळी बदल करून नव्या जाती विकसित केल्या आहेत.
सुरुवातीला देशी ‘मालपुरा’ जातीच्या मेंढीसोबत ‘रेम्बुले’ जातीच्या विदेशी मेंढराचा क्रॉस करून ‘अविकालीन’ ही नवी मेंढी जात विकसित केली आहे. थंड प्रदेशासाठी लोकर उत्पादनासाठी ‘मेरीनो’ ही चांगली मेंढी आहे. मेरीनो ही ‘रशियन मेरीनो’ व ‘चोकला’ सोबत संकरातून विकसित केली आहे. जम्मू, हिमाचल, तमिळनाडूच्या पहाडी भागामध्ये ती पाळली जाते. मेरीनो थंड प्रदेशातील लोकरी उत्पादनासाठी चांगली मेंढी असून जम्मू, तमिळनाडू, हिमाचल या पहाडी भागामध्ये पाळली जाते.
तीन मेंढीच्या संकरातून ‘अविशांत’
गेहरोल, मालपुरा, पाटणवाडी या तीन देशी मेंढींच्या संकरातून ‘अविशांत’ ही नवीन मेंढी जात विकसित केली आहे. या जातीच्या मेंढीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे दूध उत्पादनही जास्त असते . तिचा आयुष्यकाळ जास्त असतो .
मूळ मेंढ्या ह्या प्रति वेत केवळ एकच पिलू देत असतात . त्यापेक्षा संकरातून विकसित केलेली अविशांत मेंढी एका वेतामध्ये २ते ४ पिले देत असते . त्यामुळे मेंढ्याचा कळप वेगाने वाढून एकूण मांस उत्पादनही जास्त पटीने वाढते .
…अशी आहे मांस उत्पादकता
सरासरी ९०० ग्रॅम ते १ किलो लोकर एका मेंढीपासून मिळते. सहा ते सात किलो मांसाचे उत्पादन एका मेंढीपासून पूर्वी होत असे.परंतु आता केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेने विकसित केलेल्या नवीन जातीचे मांस उत्पादन १२ ते १३ किलो इतके आहे.
वंशावळ सुधारणांसाठी पुढाकार
मेंढीपासून मांस दूध, लोकर, खत आणि चामडी अशा पाच गोष्टी मिळतात. त्यामुळे त्यांना फाइव्ह स्टार पशू म्हणून म्हणले जाते. गरिबी दूर करण्यात शेळी, मेंढीचे योगदान सर्वाधिक राहिले आहे. ही बाब लक्षात घेऊन मेंढीची वंशावळ सुधारण्यावर संस्थेने भर दिला आहे.
शुद्ध जातींच्या विर्याने कृत्रिम गर्भधारणा केली जाते. वंश सुधारण्यासाठी कृत्रिम गर्भधारणेचे प्रशिक्षण दिले जाते.या आठ दिवसांच्या प्रशिक्षणाकरिता फक्त एक हजार रुपये शुल्क असून, त्यात प्रशिक्षण साहित्य, जेवण व इतर बाबींचा समावेश असतो. त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. याला पशुपालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. तोमर यांनी सांगितले.
मेंढीच्या लोकरीपासून उबदार अवि रजई तयार करणे .
या संस्थेने नुसतीच लोकर विकण्यापेक्षा त्याची मूल्यवर्धक करण्याकडे लक्ष दिलेले आहे. त्यांनी जयपुरी रजनीच्या धर्तीवर अविरजयी विकसित केली असून या त्यामध्ये केवळ तीनशे ते चारशे ग्राम लोकर लागत असल्याने वजनाने हलकी राहते. तिची किंमत केवळ 900 रुपये असते . तसेच त्या तुलनेत जयपुर रजईची किंमत 9000 रुपये आहे. अविरजही तापमान नियंत्रित ठेवते. हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यात उन्हाळ्यातही वापरता येते .