अभ्यासामध्ये मुले हुशार असतील मार्कही चांगले असतील. परंतु पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षण घेता येत नाही अशी तुमची परिस्थिती असेल तर सरकारने पाच स्कॉलरशिप उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
भारत सरकारच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मुलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील. या शिष्यवृत्ती चा फायदा समाजामधील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो . तर पाहूया या स्कॉलरशिप कोणत्या आहेत.
पंतप्रधान संशोधन फेलोशिप :- या स्कॉलरशिप मुळे तुम्हाला संशोधन क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येऊ शकते, तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात पीएचडी करायची असते तर पीएमआरएफ मदत करेल ही स्कॉलरशिप मंत्रालयाकडून मिळते. या मागचा उद्देश म्हणजे तांत्रिक संशोधनांना चालना देणे होय.
नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप :- ही योजना देखील सरकारने प्रायोजित केलेली आहे. योजना गरीब मुलांसाठी आहे या योजनेमध्ये सरकार दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना नॅशनल न्यूज कम मेरीट स्कॉलरशिप देत असते.
मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती :- या योजनेच्या उद्देश मध्य प्रदेश राज्यांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच भारतातील प्रीमॅट्रिक स्तराच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा आहे. यामध्ये 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
एकल मुलगी शिष्यवृत्ती :- मुलींना शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी इंदिरा गांधी सिंगल गर्ल कॉलरशिप सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 60 टक्के गुण दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलींना एकल बालिका ही शिष्यवृत्ती मिळत असते.
शिष्यवृत्ती प्रेरित :- ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन साठी प्रवेश घेतलेला आहे. किंवा गणित,फिजिक्स, स्टॅटेस्टिक्स आधीच्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठी प्रवेश हवा असेल त्याच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी वार्षिक साठ हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपये मिळतात.