बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला.

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार

हवामान खात्याचा अंदाजानुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या 24 तासात धडकणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केलेले आहे .या चक्रीवादळामुळे गुजरात व महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रशासन अलर्ट वर आहेत . हे चक्रीवादळ अतितीव्र होऊन गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

तसेच हे चक्रीवादळ मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता देखील आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.  या चक्रीवादळामुळे गुजरात व महाराष्ट्र मधील किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला आहे.

समुद्रात उंच लाटा उसळलेल्या आहेत .या चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग हा 150 किलोमीटर प्रति तास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहे . किनारपट्टी च्या भागांमध्ये तटरक्षक आणि एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आलेले आहे . हा बिपरजॉय चक्रीवादळाचा ट्रेलर असल्याचं म्हटलं जात आहे .बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरात सह महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे. गुजरात व महाराष्ट्र मध्ये सलग दोन दिवस काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे .

किनारपट्टी लगत 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे . गुजरात मधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे . हे चक्रीवादळ सर्वाधिक  प्रभाव कच्छ भागांमध्ये दाखवेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *