अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणे सापडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत .तसेच कृषी विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली असून पोलिसांनी आता 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे व त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
पोलिसांनी कपाशीच्या बियाण्यांचा पर्दाफाश केला आहे जिल्हा पोलीस अध्यक्ष नेरुळ हसन यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकत ही कारवाई पूर्ण केली. असून पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे व त्यापैकी आठ आरोपींना अटक केली असून ,ते गुनेगार गुजरातमधून बियाणे आणून पॅकिंग करून विक्री करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
पोलिसांनी बोगस बियाण्यांसह 1 कोटी 50 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केलेला आहे . पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. तसेच बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकाच्या विरोधात देखील अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे.
वर्धा मधील म्हसाळा परिसरात एका घरामध्ये कपाशीच्या बोगस बियाणांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बियाणे विविध कंपन्यांची बनावट पॅकेट, पॅकिंग मशीन वजन काटा इत्यादी त्यांना साहित्य आढळून आले .
ही बियाणे गुजरात वरून आणलेली असून बियाण्याचे पॅकेट करून विदर्भात विकले जात होते . एका ट्रक मध्ये असलेले बियाणे सुद्धा पोलिसांना मिळाले पोलीस व महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई केली असून एक कोटी 55 लाख 83 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कापसाचे बोगस बियाणे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यामधील गावातून आणले असल्याची माहिती मिळालेली आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या कारखान्यातून विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर ,यवतमाळ, यासह इतर जिल्ह्यात वेगवेगळ्या कृषी केंद्र मार्फत बियाणांची विक्री केली जात होती. यापूर्वी त्यांनी 14 टन बोगस बियाणांची विक्री केलेली आहे. अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलम 15 आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.