आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून दीड हजार कोटींची मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेलेले निर्णय.
▪️ पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार असून दीड हजार कोटींची मान्यता देण्यात आली आहे.
▪️ कंत्राटी ग्रामसेवकांचे वेतनामध्ये दहा हजारांची वाढ करण्यात आलेली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन मिळत असून आता तो थेट 16 हजार रुपये करण्यात आलेला आहे .कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी अनेकदा मागणी झाली होती. परंतु सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेतला आहे.
▪️अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात यावी .
▪️ पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आलेली आहे.
▪️ पशुरोग निदान प्रयोगशाळा, लातूर येथे स्थापन करणार.
▪️ अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
▪️मानसिक आजारमुक्त व्यक्तीं करता पुनर्वसन गृहे योजना .
▪️स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली.
▪️चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.