कृषी अधीक्षकांचे आवाहन ,नियंत्रण कक्षाला शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवावी.

कृषी अधीक्षकांचे आवाहन ,नियंत्रण कक्षाला शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवावी.

सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत मान्सून पूर्व पाऊस काही ठिकाणी झाला आहे तर काही ठिकाणी कडक ऊन आहे. शेतकऱ्यांची खरीप पेरणी करण्याची तयारी सुरू झाली आहे .मागच्या कित्येक दिवसापासून बनावट बियाणे विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

या घटना पाहूनच सरकारने बियाणे व खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूमची स्थापना केलेली आहे, व शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार त्यामध्ये नोंदवावी असे आव्हान कृषी अधीक्षकांनी केली आहे मागच्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट बियाणे विकले जात आहेत .कृषी विभागाने अशा केंद्र चालकांवरती कारवाई सुद्धा केली असून जिल्ह्यात खरीप हंगामात गुणवंतापुर्व बियाणे, खतांचा पुरवठा या काळाबाजार वर नियंत्रण आणण्यासाठी कंट्रोल रूम ची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये शेतकरी तक्रार दाखल करू शकतात अशी माहिती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिलेली आहे.

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत त्यांच्या समस्यांचे समाधान हे नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येणार असून या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहे .जास्त दराने बियाणे विक्री करत असल्यास खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नावासह संपूर्ण पत्ता तक्रारीचे स्वरूप याची माहिती देऊन निराकरण कक्षात तक्रार नोंदविता येणार आहे. हे नियंत्रण कक्ष पंधरा ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत सुरु राहील. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे नक्कीच समाधान होईल असे कृषी विभागाने कळविले आहे. 

मागील काही दिवसांपासून गुजरात आणि इतर परराज्यातून महाराष्ट्रात बनावटी बियाणे येत असल्याची तक्रारी पोलीस अधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे.  काही कृषी केंद्रावर विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी काही ठिकाणी रस्त्यात बनावट बियाणांचे ट्रक ताब्यात घेतले आहेत. हे सर्व भयंकर असल्यामुळे कृषी विभागाकडून कंट्रोल रूम ची स्थापना केलेली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *