कापसाच्या खरेदीवर लावण्यात येणारा आरसीएम रद्द करा. बाजार समितीच्या करामध्ये एक समानता आणा .कापूस गाठी निर्यात करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन जिनिंगचा वाटा ठेवा. नवीन युनिटला जशी सोलर प्लांट साठी सबसिडी देतात तशी जुन्या युनिटलाही सबसिडी द्या
अशा अनेक मागण्या महाराष्ट्र कापूस असोसिएशनचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासमोर ठेवल्या महाराष्ट्र कापूस असोसिएशन मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यांमधील कापसाचे व्यापार करणारे जिनिंग व्यवसाय करणारे समाविष्ट आहेत. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची मंगळवारी भेट घेतली.
कापसाच्या खरेदी विक्री संदर्भामध्ये येणाऱ्या अडीअडचणी याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारची कापसाविषयी असलेली धोरणात सुधारणा. जिनिंग मिल्क यांना आवश्यक असलेली करा मध्ये सवलत, बाजार समितीमध्ये कापसाच्या खरेदी विक्री व्यवहारात लावत असलेला कर जिनिंग मिल ची विजेची सबसिडी, याबरोबरच जिनिंग मिल्क येथे बसवण्यात आलेले सोलर प्लॉट, तसेच वेगवेगळे योजनेचे अनुदान मिळण्याबाबत निवेदन देत याविषयी सविस्तर मांडणी कापूस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर कराड यांच्यासमोर केली.
यावेळी असोसिएशनची पदाधिकारी विजय बियाणी ,विजय अग्रवाल ,रजदीप सिंग चावला, ओम प्रकाश डागा, यश अग्रवाल, निखिल अग्रवाल, रामेश्वर राठी , प्रल्हाद तायल आणि सोमानी या सोबतच कॉटन असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.