राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुध दर निश्चितीसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. राज्यातील दूध दर प्रश्न बाबत सहकारी व खाजगी संघ, दूध उत्पादक पशुखाद्य उत्पादक कंपन्या. व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सोबत 22 जून रोजी कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती .
या बैठकीमध्ये दुधाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली होती. राज्य दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संघांकडून करण्यात येते. दूध उत्पादन कमी असल्याने, शेतकऱ्याच्या दुधाला रास्त भाव मिळतो मात्र दूध उत्पादन हे वाढल्याने विविध खाजगी ,सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दरात स्वीकारले जाते.
यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन दूध संघाचा परिचालक खर्च तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाला किमान भाव मिळावा या अनुषंगाने दुधाचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष दूध व्यवसाय विकास आयुक्त असणारा असून ,यामध्ये सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी तसेच खाजगी दूध संघाचे प्रतिनिधी अशी दहा जणांची समिती असणार आहे. ही समिती दर तीन महिन्यानंतर बैठक घेऊन राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला दिला जाणारा किमान दर निश्चित करतील.