सध्या सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत टोमॅटो बरोबरच काही भाज्यांचे देखील दर झपाट्याने वाढले आहेत . कडक उष्मा कमी उत्पादन, आणि उशिरा झालेला पाऊस याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे किरकोळ भाव 120 रुपये वर गेले आहेत .
यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही .मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात तीन रुपये किलो आणि किरकोळ बाजारात दहा ते वीस रुपये किलो होते. मात्र जून मध्ये त्यात अचानक वाढ झाली आहे.
हे दर आता शंभर रुपयांच्या वर झाले आहेत .लवकरच पाऊस न पडल्याने हा परिणाम झाला आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने बेंगलोर वरून टोमॅटोची आवक होत आहे .
नुकत्याच झालेल्या पावसाने पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी तारांच्या आधारे झाडे उभारत आहे. टोमॅटो घेण्यासाठी दिल्लीची व्यापारी देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी बोलत आहेत .
भविष्यातही भाव चढेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. नवीन पीक आल्यावर भाव खाली येण्याची अपेक्षा आहे .आता ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे. त्यांची मात्र दिवाळीच सुरू आहे.