नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अत्यंत महत्त्वाचा जीआर आलेला आहे. बऱ्याच वर्षापासून मित्रांनो दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मग ते दुष्काळामुळे असो की जास्त पाऊस पडल्यामुळे म्हणजे अतिवृष्टीमुळे असो , तर त्यासंबंधित ही कर्जमाफी आहे . मित्रांनो त्या संबंधित हा जीआर आहे. तर जीआर काय असणार आहे. ते आपण सविस्तर बघुन घेउया
तर चला मित्रांनो सुरू करूया बघा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरीत करणे बाबत. तर ही कर्जमाफी कोणत्या वर्षाची आहे? ते आपण सविस्तर या जीआर मध्ये बघणार आहोत .बघा 24 जुलै 2023 म्हणजे या तारखेचा हा जीआर आहे .सविस्तर आपण थोडं प्रस्तावना मध्ये बघून घेणार आहोत. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतक-यांचे पिक कर्ज माफ करण्याचा योजनेंतर्गत आतापर्यंत रुपये 52,512.00 लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे .
सदर योजनेसाठी सन २३- २४ साठी रुपये पन्नास लाख इतका निधी उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक चार दिनांक २३ / ६ /२३ च्या पत्रान्वये सदर योजनेसाठी रुपये पन्नास लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 50 लाख जो निधी आहे तो या ठिकाणी सरकारने मंजूर केला आहे .बघा शासन निर्णय काय झालेला आहे .
शासन निर्णय
सन तेवीस-चोवीस आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रुपये पन्नास लाख एवढा निधी राज्यात जुलै 19 ते ऑगस्ट 19 या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या, पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर, अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
तर मित्रांनो 50 लाखाचा निधी आहे तो मिळणार आहे. हा जो निधी आहे हा कुणाला मिळणार आहे? तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नैसर्गिक आपत्तीमुळे, तर निधी कशा स्वरूपात मिळणार आहे? कर्ज स्वरूपात म्हणजे पीक कर्ज घेतलेले आहे त्यांना हा निधी मिळणार आहे. 2019 यावर्षी ज्यांनी पिककर्ज घेतले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना या आधी निधी मिळालेला आहे, पन्नास हजाराचे प्रोत्साहन पर निधी मिळालेला आहे. काही नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकरी बाधित झालेले होते त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने हा निधी उपलब्ध केला होता . तर मित्रांनो ज्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते शेती पिकांचे नुकसान झालेले होते. त्यांचे अहवाल तलाठी मार्फत सरकारला पाठवण्यात आले होते ,अशा शेतकऱ्यांचे पीककर्ज आहे मित्रांनो हे माफ होणार आहे . ते म्हणजे संपूर्ण जे पीक कर्ज असेल ते या ठिकाणी माफ होणार आहे.