कृषिमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांना पेरणीआधी सरकार १० हजार देण्याच्या तयारीत.

perani

सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रति एकरी पेरणी आधी दहा हजार रुपये देण्याचे निकष आयुक्तांकडून सरकारला देण्यात आलेले आहे

सरकार देखील आता या निकषावर सकारात्मक असल्याचे व यावर जलद निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील.चिंचणी या ठिकाणी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते पत्रकारांशी बोलत होते.25 पेक्षा अधिक उपायोजना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष या कडे लागले आहे.

शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या उपायोजना करता येतील त्या आम्ही करू तसेच राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांविषयी खूप संवेदनशील आहेत असं मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

सरकार युरियाचा काळाबाजार थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करून असे आश्वासन शेतकऱ्यांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले सध्या पावसाळा तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे शेतकऱ्यांसाठी विविध उपयोजना राज्यात आणणार असल्याचे कृषिमंत्री सतार म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *