शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत व आंतरराज्य शेतकरी सहल व शेतकरी प्रशिक्षण विविध नामांकित प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणार आहेत.
शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत व आंतरराज्य शेतकरी सहल व शेतकरी प्रशिक्षण विविध नामांकित प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणार आहेत.
आत्मा च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते, पारंपरिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांना उत्पन्नात पाहिजे तशी वाढ होत नाही.
त्यामुळे त्याच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच प्रशिक्षण व सहलीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, जालना जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र बदनापूर व खरपुडी येथे कपाशी, तूर आणि सोयाबीन या पिकाच्या उत्पादन वाढीचे तंत्र शेतकऱ्यांना शिकविल्या जाणार आहे.
राज्याबाहेरील शेतकरी प्रशिक्षण जास्त ७ दिवसापर्यंत प्रतिपण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षण शुल्क, शेतकऱ्यांचे मुक्कामाची व भोजन व्यवस्था जाणे – येणे यासाठी खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रति दिवस १२५० रुपये खर्च अनुज्ञेय राहणार आहे.
प्रशिक्षण कृषी व संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण – सिपेट लुधियाना पंजाब, सोयाबीन प्रक्रिया उद्योग – भोपाळ मध्यप्रदेश, सेंद्रिय शेती गंगटोक सिक्कीम, रेशीम शेती, रामनगर कर्नाटक, तृण धान्य आधारित प्रशिक्षण केंद्र हैदराबाद तेलंगणा, कृषी औजारे प्रशिक्षण मध्यप्रदेश यासारख्या नामांकित संस्थांमध्ये देण्यात येणार आहे.
राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, मत्स्यपालनाचे तारापोरवाला सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्र मुंबई यासारख्या नामांकित प्रशिक्षण केंद्रात किंवा त्यांच्या अधिनस्त संशोधन केंद्र यामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी १००० रुपये खर्च प्रति दिन असणार आहे. मोसंबी बदनापूर, कृषी संशोधन केंद्र , बदनापूर कृषी विज्ञान केंद्र कृषी विज्ञान केंद्र खरपुडी इत्यादी ठिकाणी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सहली देखील आयोजित केल्या जाणार असल्याचे आत्माच्या प्रकल्प संचालक चव्हाण यांनी कळविले.
शेतकरी प्रशिक्षण सहलीसाठी विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे इत्यादी सह तालुक्यातील आत्माच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सहायक तंत्र व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मायाच्यावतीने करण्यात येत आहे.
source:- agrowon