पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाकडून कात्रज डेरी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर एक रुपयाचा फरक दिला जाणार आहे कात्रज डेरी च्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
हा फरक येत्या दिवाळी पूर्वी वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कात्रज डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी यावेळी बोलताना केली कात्रज डेरीला 2022 23 या आर्थिक वर्षामध्ये 51 लाख रुपयांचे निव्वळ नफा झाला आहे नफा होणे मागे कात्रज डेअरीला दूध पुरवठा करणारे शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून एक रुपयाचा फरक देण्याचे निर्णय संचालक मंडळांनी घेतलं असून या फरका पोटी सहा कोटी 73 लाख रुपयांची वाटप केले जाणार आहे असे संघाचे अध्यक्ष पालकर यांनी या सभेत दूध संघाच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा जाहीर केला आहे.
प्रत्येकी रोख 11000 रुपये प्रशस्त पत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या सभेला दूध संघाचे आजी-माजी संचालक दूध उत्पादक संस्थांची प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी आभार मानले.
प्रतिक्रिया:
संघ सातत्याने दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेत असून उत्पादकांना जास्तीत जास्त दूध खरेदी दर देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. काही अडचणी असल्या तरी त्या सोडविण्यात येतील. यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही संघास सहकार्य करावे.
सन्मानित करण्यात आलेल्या आदर्श दूध संस्था
१) काठापूर बु. सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, काठापूर बु, ता. आंबेगाव
२) श्री. भिमाशंकर महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, चांभारेवस्ती (सुपे), ता. खेड
३) श्री. हनुमान सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, होगजेवाडी (औदर), ता. खेड
४) श्री. मल्लिकार्जुन सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, न्हावरा, ता. शिरुर
५) श्री. नागेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, निमोणे, ता. शिरुर
६) फराटे पाटील सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, मांडवगण फराटा, ता. शिरुर
७) जयमल्हार महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, नंदादेवी (नांगरेवाडी), ता. दौंड
८) यशवंत सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, जाधववाडी, ता. जुन्नर
९) श्री. आदिशक्ती सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, तांबे, ता. जुन्नर
१०) विठ्ठल रुक्मिणी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वरसगांव, ता. वेल्हा
११) हेमलाता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, मांजरी बु., ता. हवेली
१२) कानिफनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, दिसली, ता. मुळशी
१३) बलराम सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, आणे, ता. जुन्नर
१४) अंदरमावळ विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वहानगांव, ता. मावळ
१५) काळदरी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, काळदरी, ता. पुरंदर, जि. पुणे
१६) श्री. दत्तकृपा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, दामगुडेवाडी, ता. भोर, जि. पुणे
सन्मानित करण्यात आलेल्या पशुखाद्य संस्था
१) लक्ष्मीमाता वाळकी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वाळकी, ता. दौंड
2) अंबिका सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, भांबर्डे, ता. शिरुर
3) वाकेश्वर पेठ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, पेठ, ता. आंबेगाव
३)