मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढण्यात आखेर यश आले आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. तसेच याबाबत शनिवारी (दि २७ रोजी) अध्यायदेश काढला आहे . त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथून मुंबई असा मोर्चा काढला होता. तर त्यांचा ताफा वाशीतच थांबण्यात आला होता. तेथेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात येत होती. आता त्या चर्चेस यश आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी नोंदणी प्रमाणपत्र देण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २०११ पासून लढा सुरू होता. त्यास २०२४ मध्ये यश आले आहे. आता मनोज जरांगे यांचा १४ वर्षांचा वनवास संपला आहे.असे म्हणण्यास हरकत नाही .मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात आलेला आहे. ज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगितले आहे. वाशीत जमा झालेल्या मराठा समाजातील बांधवानी या आरक्षण निर्णयानंतर जोरदार जल्लोष केला.
यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देताना, कोणाला जातप्रमाणपत्र मिळण्यात अडचण आली तर मी लढत राहणार आहे. माझे आंदोलन यापुढे सुरु राहणार असल्याचे म्हटलं आहे.
वाशीत विजयी सभा..
तब्बत १४ वर्षांची वाट पाहायला लागल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आज तो क्षण सत्यात उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. यामुळे राज्यभर आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान राज्य सरकारने यावर अध्यायदेश काढल्याने आज शनिवारी (दि २७ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी-नवी मुंबई येथे विजयी सभा होणार आहे . यासभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दिपक केसरकर , मंत्री गिरीश महाजन, उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विजयी गुलाल लावला.
सर्व श्रेय समाजाचे
समाजाने मराठा आरक्षणासाठी खूप संघर्ष केले . त्यासाठी मी ही संघर्ष केला. शेवटी आम्हाला मुंबईकडे यावे लागले . यानंतरच हा अध्यादेश मराठ्यांच्या ताकदीमुळे निघाला. यामुळे हे श्रेय सर्व समाजाचे आहे.
५४ लाख नोंदी सापडल्या…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आवाज उढवल्यानंतर कुणबी शोध मोहीम राज्य सरकारकडून हाती घेण्यात आली. या मोहीमेतून मराठ्यांच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत . तर मनोज जरांगे हे मुंबईकडे निघाल्यानंतर सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे गावोगावी शिबीरे आयोजित केली जात आहेत.
मनोज जरांगे यांच्या मागण्या
◼️ नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या
◼️ शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या
◼️ कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा
◼️ जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
◼️ आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा
◼️ आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या
◼️ SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या
◼️ वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या
◼️ रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.












