![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/मिरचीची-मोठ्या-प्रमाणावर-आवक.webp)
नंदुरबार बाजार समिती ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते . या बाजारपेठेमध्ये फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे.
गेल्या वर्षीच्या संपूर्ण हंगामात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. परंतु , यावर्षी मिरचीने बाजार समितीमध्ये 2 लाख 60 हजार क्विंटल आवकेचा टप्पा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार केला आहे. बाजार समितीत 3 लाख क्विंटल खरेदीचा टप्पा हंगाम संपेपर्यंत पार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोणत्या मिरचीला किती दर ?
यावर्षी शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन झाले आहे. तसेच नंदुरबार जिल्यामध्ये ही मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक नंदुरबार बाजार समितीमध्ये झाली आहे. 2 लाख 60 हजार आवक झाली आहे. सध्या 2500 ते 9000 हजार रुपयापर्यंतचा दर ओल्या लाल मिरचीला मिळत आहे. तर 7500 ते 18000 हजार रुपयापर्यंतचा दर कोरड्या लाल मिरचीला मिळत आहे.
तर दररोज 2000 क्विंटल मिरचीची आवक 100 ते 150 वाहनातून होत आहे. मार्च महिन्याच्या शेवट पर्यंत हंगाम सुरु राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यात केली जात असते. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण अश्या हवामान बदलाचा मिरची पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता.
चुरडामुरडा आणि डवणीचा प्रादुर्भाव मिरचीच्या पिकावर झाला होता. शेतकऱ्यांनी अशा स्थितीत देखील मिरचीचे चांगल उत्रादन घेतले आहे. जिल्ह्यातील वातावरणात होणाऱ्या बदलाचा सर्वाधिक परिणाम मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसत आहे. सारखे होणारे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसत आहे. यामुळे मिरची काळी पडणे आणि मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट झाली आहे. तसेच अवकाळी पावसात सापडलेल्या मिरचीची पतवारी कमी झाल्याने तिला मिळणारा दरही कमी झाला आहे.