निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा या तांदळाचे महत्व

पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते.  या भागातील इंद्रायणी भाताला देखील मोठ्या प्रमाणात राज्यात मागणी आहे. मात्र मलेशिया, थायलंड सारख्या देशात घेण्यात येणारे निळ्या रंगाच्या भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मुळशी मधील लहू फाले या शेतकऱ्याने केला आहे.

अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला आणि या भाताला शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळा रंगाच्या भारताची लागवड केली होती.  तो आता तयार झाला आहे.  त्यांचा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगांचा आहे.

असे आहेत या तांदळाचे फायदे?

हा भात मलेशिया , थायलंड येथेच उत्पादित होतो.  याची वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे.त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे. निळा भात  आरोग्यवर्धक असून त्यामध्ये लोह ,झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असून हा तांदूळ मधुमेह,  असणाऱ्या साठी उपयोगी आहे.  हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजाराने ग्रस्त रुग्णासाठी गुणकारी आहे.

मुळशी तालुक्यामध्ये लहू फाले  यांनी पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका तसेच कृषी सहाय्यक शेखर वितरक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटांपर्यंत  होते व तो ११० ते १२० दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होतो.  भाताचे उत्पादन एक एकरात सोळाशे किलो पर्यंत होते.

या भातास प्रति किलो 250 रुपये बाजार भाव मिळतो औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देतो. 

Leave a Reply