ऐकावे ते नवलच , ड्रायवरशिवाय ट्रॅक्टर करतोय शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी, राज्यातला पहिलाच प्रयोग,जाणून घ्या सविस्तर ..

भारतीय शेती नवतंत्रज्ञान वाढले असून त्याच अनुषंगाने शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे . अशातच अकोला जिल्ह्यामधील तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे . जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातला हा पहिल्यांदाच केलेला वापर असल्याचा दावा वरोकार कुटूंबियांनी केला आहे .‘अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे . एका रेषेत सरळ पेरणी या तंत्रज्ञानमुळे होते त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत आहे असे ते म्हणाले . चला तर मग जाणून घेऊया ,कसं आहे हे विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारे ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी मशीन.

विनाचालक ट्रॅक्टरच शेतात काम करू लागले..

पूर्वी पेरणी म्हटलं की, मोठी लगबग असायची. बैलं, तिफन, तिफनमागे पेरणासाठी लागणारी माणसे . काळाने आता कृषी क्षेत्रातही क्रांती केलीय. बैलजोडी, तिफन जाऊन ट्रॅक्टर आणि पेरणीयंत्र आले आहे .मात्र ,ट्रॅक्टर चालवायला तंत्रज्ञानातील प्रगतीनंतरही चालक हा लागत होता. परंतु , आता याही टप्प्याच्या तंत्रज्ञान पुढे गेले आहे आता ट्रॅक्टरच विनाचालक शेतात काम करू लागले आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला स्टेअरींगचे आपोआप फिरणे हे कदाचित जादू वाटत असेल . परंतु ,ते ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी मूळे हे शक्य झाले आहे . हा प्रयोग अकोल्यातील वरोकार या शेतकरी कुटूंबाने आपल्या शेतात केलाय. अकोला येथील राजू वरोकार व विजयेंद्र असे हे तंत्रज्ञान वापरणार्‍या शेतकऱ्यांचे नावे आहेत .

राज्यातील पहिलाच प्रयोग..

या तंत्रज्ञानामध्ये शेतात पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे चालकाची गरज नाहीये. या शिवाय पेरणीही अगदी सरळ होते. जर्मन तंत्रज्ञानाचे आर्टीके उपकरण यासाठी लावण्यात आले आहे. अभियंता आणि अभ्यासक आशिष हांडे यांनी सांगितले कि जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जात असते .ट्रॅक्टरमधील उपकरणासोबत आर्टीके हे उपकरण जोडलं जातं. त्यासाठी शेतकर्‍यांना 4. 5 ते 5 लाख रूपये इतका खर्च येत आहे . हे उपकरण जर्मन बनावटीचे आहे. अकोला येथील आत्मा या कृषी विभागाचे प्रकल्प संचालक मुरली इंगळे यांनी सांगितले कि पुढील काळात या प्रयोगाद्वारे अधिकाधिक शेतकरी अशी यांत्रिक पेरणी करण्यासाठी कृषी विभाग आता पुढाकार घेणार असल्याची महिती दिली.भारतीय शेतीने आता मळलेल्या वाटा सोडत नव तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे.

Leave a Reply