नुकतीच भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांची माहिती दिली, राज्यामध्ये पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे रडार बसवण्यात येणार असून देशातील हवामानाचा अंदाज अचूकतेने वर्तवण्यासाठी आता पर्जन्यमान, हवामानाच्या नोंदी देशभरात ग्रामपंचायत स्तरावरून घेतल्या जाणार आहेत. भूविज्ञान मंत्रालय , ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे.
सद्या हवामान विभागाकडून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर हवामान अंदाज दिले जातात, सध्या देशभरातील सुमारे सात हजार मंडल स्तरावर वेधशाळा आहेत. परन्तू अधिक अचूक अंदाजासाठी अधीक सूक्ष्म नोंदींची गरज आहे. त्यामुळे आता हवामानाच्या अचूक अंदाजासाठी आता ग्रामपंचायत स्तरावरून हवामानाच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत असे कृषी महाविद्यालयातील वेधशाळेच्या नूतनीकरण इमारतीच्या उद्घाटना नंतर पत्रकारणाशी संवाद साधताना भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी माहिती दिली.
हवामान विभागाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील हवामानाच्या नोंदी
हवामान विभागाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील हवामानाच्या नोंदीचा डाटा आहे. त्यामध्ये पर्जन्यमान, तापमान, पृष्ठभागाचे तापमान या गोष्टींचा समावेश आहे. या डाटा चे विश्लेषण आणि अभ्यास करून अचुक हवामान अंदाज आणि मार्गदर्शन करता येऊ शकते. याचा वापर नवं उद्योजकांनी होऊ शकतो, असे डॉ. महापात्रा म्हणाले.