शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? उतरल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील खतांच्या किमती वाचा सविस्तर …

khatacha kimti

जागतिक बाजारात खतांच्या किमती कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने अनुदान (एनबीएस) कपात करून दर स्थिर ठेवण्याची चलाखी करू नये.

कोरोना लॉकडाउन त्यानंतर सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे रासायनिक खते (Chemical fertilizers) तसेच त्यासाठीच्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे जागतिक बाजारात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या.

लॉकडाउनपूर्वीही केंद्र सरकारकडून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढविण्याचे सत्र सुरू होते. २०१६ मध्ये रासायनिक खतांच्या अनुदानात केंद्र सरकारने मोठी कपात केली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या किमती प्रतिबॅग १०० ते १७० रुपयांनी वाढल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *