सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. सर्व वीजजोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकप्रतिनिधींनी सर्व शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही हे पाहणे लोकप्रतिनिधींचे काम आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यासाठी त्यांनी बैठक सुद्धा घेतली होती या व्यतिरिक्त सौर पंप योजनेसाठी लोकांचे मनांच्या जागृती निर्माण करावी यावेळी असेही त्यांनी सांगितले.
भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची सद्यःस्थिती, बिरसामुंडा कृषी क्रांती योजना, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, नवीन विहिरींचे वाटप राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत, या सर्व योजनेचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी घेतला. तेलगाव मधील उर्मिला राऊत यांना व कृषी यांत्रिकीकरण या योजनेतून नागपूर जिल्ह्यातील रामदास उमटे यांना ट्रॅक्टर देण्यात आला.
अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसला.आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली.आता पावसाळ्यात पाऊस कसा पडतोय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.