शेतकरी बंधुनो नमस्कार, हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे, राज्यात 21 ,22 ,23 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डंख यांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या वर्षी मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची नांगरट व इतर सर्व कामे लवकर आटपून घ्यावीत. येत्या ८ जूनला राज्यात मान्सून सुरू होणार आहे. अंदमान मध्ये आज मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे २१,22 ते २३ मे रोजी मान्सून पूर्व पाऊस पडण्याची
शक्यता आहे. तसेच मान्सून पूर्व पाऊस हा १ ते ३ जून या तारखेलाही होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.त्यामुळे मान्सूनचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू करावी .८ जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लागणार आहे. यंदाच्या वर्षी पाऊस हा चांगला पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
22 , 23 ते 24 मे दरम्यान पूर्व मोसमी पाऊस
सर्व शेतकऱ्यांनी मान्सूनचा अंदाज लक्षात घेऊन आपले शेतीचे राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत तसेच हवामान अंदाजाने सांगितल्यानुसार 8 जूनला पावसाच्या आगमन होणार आहे व यावर्षी मान्सूनची प्रगती चांगली राहणार आहे.
8 जून ला मान्सून दाखल होणार.
यंदा पाऊस लवकर येणार असल्याचे पंजाबराव डख सांगितले आहे. त्यामुळे शेतीची कामे लवकर आटपून घ्यावीत , आता फक्त 10 दिवस बाकी राहिले आहे. यामध्येच मान्सूनपूर्व पावसाला ५ दिवस राहिले आहे. हे सर्व अंदाज शेतकरांनी लक्षात घ्यावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा दुष्काळ पडणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे.