कोरडवाहू प्रक्षेत्रावर येणारे अतिशय महत्वाचे डाळींब हे फळपिक आहे. महाराष्ट्र राज्य हे डाळींब पिकासाठी अग्रेसर आहे. उत्पादनामध्ये अग्रेसर असले तरी महाराष्ट्र राज्यातील डाळिंब पिकाची उत्पादकते मध्ये घट झाली आहे . यातील अनेक कारणांपैकी प्रामुख्याने वातावरणीय बदल, जमिनी व पिकाचे आरोग्य,अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, इत्यादी प्रमुख कारणे आहेत. डाळिंब बागांची अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी अँटी हेलनेट कव्हर घटकाचा शासकीय योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी शेतकरी वर्गाकडून सतत मागणी होत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांच्या स्तरावर तज्ञ समितीने डाळिंब फळबागांचे गारपीटीपासून संरक्षणासाठी उपाय म्हणून अँटी हेल नेट कव्हर एम.एस. अँगल सांगाड्यासहित या तंत्रज्ञानाबाबत शिफारस करण्यात आली आहे. गारपीट व अतिवृष्टीपासून फळे व झाडांचे अँटी हेल नेट कव्हर एम.एस. अँगलच्या संरचनेवर लावल्याने संरक्षण होते.महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत १०० हेक्टर क्षेत्राकरिता प्रायोगिक तत्वावर सदर घटकाची अंमलबजावणी केली जात आहे .
पात्रतेचे निकष
योजनेअंतर्गत रोपवाटीका पूर्णपणे नव्याने उभारावयाची आहे.
यापूर्वी या घटकांतर्गत शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटीकाधारक,
शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटीकाधारक
तसेच एकात्मिक फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, पोकरा किंवा इतर योजनेतून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुनःश्च सदर योजनेंतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत.
योजनेचा उद्देश :
शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या आणि उच्च दर्जाच्या निर्यातक्षम डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक मदत करणे. डाळिंब बागांचे गारपीट व अवकाळी पाऊस यापासून संरक्षण करणे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब फळबागांकरिता करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
कृषी क्षेत्रात ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
लाभार्थी निवडीचे निकष..
◼️ शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.या योजनेमध्ये स्वतःच्या मालकीची जमीन जर नसेल तर शेतकऱ्यांच्या आपसातील भाडेपट्टा करार ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेतून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुनःश्च सदर योजनेमध्ये लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत.
◼️ शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था / भागीदारी संस्था, वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्था यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
◼️ डाळिंब बागांसाठीच अँटी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाचा वापर बंधनकारक राहील.
◼️ महाडिबीटी प्रणालीवर या घटकाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्ज करणे गरजेचे असेल . तसेच जिल्ह्यास दिलेल्या लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थी निवडीमध्ये सदर शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल .
◼️ या योजनेमध्ये निवड होण्या अगोदर सदर घटकाची अंमलबजावणी केली असेल किंवा उभारणी केलेला शेतकरी अपात्र राहणार आहे .
अंमलबजावणीची कार्यपद्धती :
◼️ इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी https:// mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत.
◼️ लाभार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर सदर घटकासाठी निवड झाल्यानंतरखालील कागदपत्रे अपलोड करावीत.
◼️ आधार कार्डची झेरॉक्स
◼️ ७/१२ उतारा (डाळिंब फळबागेच्या नोंदीसह)
◼️ आधार लिंक केलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडावी .
◼️ जात प्रमाणपत्र (अनु जाती/अनु जमाती शेतकऱ्यांसाठी)
◼️ चतु सीमा नकाशा
◼️ विहीत नमुन्यातील हमीपत्र,