कृषीमंत्री धनंजय मुंडे : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करावा, कृषी विद्यापीठांनी फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत,

कृषीमंत्री धनंजय मुंडे : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करावा, कृषी विद्यापीठांनी फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत,

चालू हंगामामध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेती संबंधित कामासाठी ड्रोन द्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. शेतीमधील रोजच्या कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे.  मजुरीचे दर  शेतकऱ्यांच्या अवाक्य बाहेर चालले आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी, अशी दैनंदिन कामे होणे गरजेचे असल्याचे मुंडे म्हणाले.

तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांनी देशात आदर्श निर्माण करावा असे मतही मुंडे यांनी व्यक्त केले आहे . कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे मुंडे म्हणाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट ड्रोन प्रशिक्षण संस्था आर पी टी ओ अंतर्गत सुरू असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठातही चालू करण्याबाबत प्रकल्पाचा आढावा बैठकीत करून घेण्यात आला आहे . यावेळी मुंडे बोलत होते. त्या बैठकीमध्ये कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, संतोष कराड तसेच कृषी विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.  कृषी विद्यापीठांनी शेती संबंधित कामासाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावीत, असे निर्देश मुंडे यांनी दिले.

ड्रोन द्वारे फवारणीसाठी शासनाचा पुढाकार.. 

सध्या शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुराची उपलब्धता कमी असते व मजूर उपलब्ध झाले तर मजुरी देखील शेतकऱ्यांच्या  आवाक्याबाहेर   असते . त्यामुळे ड्रोन द्वारे शेतीतील पिकाची फवारणी करणे गरजेचे असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.  त्यासाठी शासन पुढाकार घेतील ही कामे ड्रोन द्वारे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळांद्वारे केल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च किती फरक पडेल याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.. 

विद्यापीठांनी शेतकऱ्याला येणाऱ्या उत्पादन खर्चाचा अहवाल शासनाला सादर करावा… 

विद्यापीठांनी कापूस, सोयाबीन, तूर ,भात, ऊस ,इत्यादी सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश असलेल्या प्रत्येकी 100 एकर अकराच्या प्लॉटवर ड्रोन चा वापर करावा.  यासाठी शेतकऱ्याला येणाऱ्या उत्पादन खर्चाचा तुलनात्मक अहवाल शासनाला सादर करावा.

त्या आधारावर राज्यात सर्वत्र शेतीतील दैनंदिन कामासाठी ड्रोन चा वापर करण्याचे धोरण शासन निश्चित करेल असेही निर्देश या बैठकीत मुंडे यांनी दिले आहेत.  राज्यातील कृषी विद्यापीठांनी देशात आदर्श निर्माण करावा कृषी क्षेत्र ड्रोनच्या वापरामुळे युवकांना रोजगार ची संधी उपलब्ध होईल.  यासाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचना धनंजय मुंडे यांनी या बैठकीमध्ये दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *