शेतकऱ्यांना दिलासा ; कांद्याचे भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले…

शेतकऱ्यांना दिलासा ; कांद्याचे भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले,...

सध्या बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दरात चांगली सुधारणा दिसून आली आहे.  मागील आठवडेभरात कांदा भाव क्विंटल मध्ये 500 ते 700 रुपयांनी वाढले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . यंदा उष्णता आणि पावसामुळे कांदा काढणीच्या अवस्थेत कांदा पिकाची गुणवत्ता कमी झाली होती . शेतकऱ्यांनी कांदा जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसल्याने कांदा विकला अनेकांनी तर फुकट विकल्यासारखा कांदा विकला आहे.

जुलै महिन्यामध्ये पावसामुळे चाळीतील मालाची नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत होते.  पाणी लागलेला कांदा जास्त दिवस टिकत नाही.  हा कांदा मागील तीन आठवड्यामध्ये बाजारात आला.  आता चाळीतील कांद्याचे प्रमाण घटले आहे.  दरम्यान या पुढील काळात कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाणार आहे.  असे व्यापारी सांगत आहे . चाळीतील माल हा कमी असल्याने बाजारामध्ये कांद्याची टंचाई वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे कांदा भावातही सुधारणा झाल्याचे दिसत आहे.  सध्या कांद्याला प्रत्येक क्विंटल सरासरी 1500 ते 2000रुपयांचा भाव मिळत आहे.  तर गुणवत्तेच्या कांद्याला बाजारामध्ये 2500 रुपये भाव मिळाला आहे.

बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका.. 

बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे.  तसेच अनेक भागात झालेल्या पावसाचाही पिकांवर परिणाम झाला आहे.  तसेच काही भागांमध्ये साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  दर नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडून गेला.  बाजारात कांदा विकायला नेणं देखील परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा देखील काढला नव्हता.  दरम्यान सध्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे.  साठा करून ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे . त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे भाव वाढणार आहेत. 

ज्या  शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्यांना फायदा होणार..

गेल्या काही महिन्यापासून हे कांद्याचे दर हे स्थिर होते.  मात्र सध्या कांद्याचे दरामध्ये वाढ होत असताना दिसत आहे.  मुंबईतील एपीएमसी कांदा मार्केटमध्ये दरवाढ होत असताना दिसत आहे.  गेल्या काही दिवसापासून पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा कांदा 30 रुपये किलो पर्यंत गेला आहे. 

Leave a Reply