कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना खता संबंधित तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप ॲप क्रमांक सुरू करा. तात्काळ व्हाट्सअप क्रमांक सुरू करा व तो क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा . असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला निर्देश दिले. शेतकऱ्यांना काही खत विक्रेते खत खरेदी करण्यासाठी सक्ती करतात किंवा बोगस खत विकून फसवणूक करतात शेतकरी हा खत विक्रेत्यावर विश्वास ठेवून खत खरेदी करत असतो. पण याच्यामध्ये कधी कधी त्याची फसवणूक होते .कशापासून करणाऱ्या खत विक्रेत्या विरुद्ध शेतकऱ्यांना आता तक्रार करता येणार आहेत त्यासाठी तात्काळ whatsapp क्रमांक सुरू करा व तो व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
बियाणे पुरवठा बाबत मंत्रालयात घेतला आढावा.
कृषी विभागाचा अडीच तास धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठा आणि कृषी निविष्ठा याबाबत त्यांनी मंत्रालयात आढावा घेतला. या बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील संचालक विस्तार आणि सेवा विकास पाटील उपस्थित होते. व्हाट्सअप नंबर वर तक्रार करण्याचे नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल संबंधित जिल्ह्यातील फरारी पथकांना मेसेज जाईन संबंधित पथक तपासणी करून कारवाई करेल.
कायद्यात सुधारणा करण्याची गरज
कापसाची आणि अनधिकृत बियाणांची राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. यासाठीच महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 आणि नियम 2010 अंतर्गत शेतकरी तक्रारी करतात. आतापर्यंतचे हजारो दावे उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्या कंपन्यांवर कारवाई होत नाही . तक्रार करणारे शेतकरी यात भरडला जातो . यामुळे या कायद्यात अमुलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
परवाना प्रणालीत सुधारणा आवश्यक
कापसाच्या एचटीबीटी या वाणाला राज्य शासनाने परवानगी दिली नाही. मात्र तरीही राज्यात एसटीबीटी या बियाणांची विक्री होते. त्यामुळे बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
ओडिशा ने बियाण्यांच्या तक्रारीसाठी ॲप तयार केले आहे . तसेच ॲप किंवा पोर्टल तयार करावे. अशा सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे. असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी दिली.