शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचे अजित पवार यांचे आश्वासन ,शेती वीज बिलावरुन त्यांनी केली मोठी घोषणा..

पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे .शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येते ती येऊ नये म्हणून आम्ही विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. पुढील पाच वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.अजित पवार हे नाशिकच्या कळवण येथे झालेल्या सभेत बोलत होते..

अजित पवार म्हणाले की, पावसाचे दिवस आहेत, आणखीन काही धरणे भरायची बाकी आहेत. आपल्याला अजूनही पावसाची गरज आहे. मी सर्व देवांना प्रार्थना करतो. मागे पांडुरंगालाही प्रार्थना केली. सर्व धरणे तुडुंब भरावीत , शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण येऊ दे. नाशिक द्राक्ष उतपदकांना विनंती आहे की, पैसे बुडावणाऱ्यांना द्राक्ष विकू नका.जास्त व्याज देणारे पैसे बुडवत असतात त्यामुळे सह्याद्री सारख्या काही संस्था आहेत यांच्याकडे द्राक्ष द्या. मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात पवार साहेबांना दैवत मानून केली आहे अडीच वर्षांनी सरकार पडले.त्यानंतर काही आमदार भेटून विकास कसा करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मी वरिष्ठांना भेटून शिवसेना चालती तर भाजप का नाही ?अशी भूमिका मांडली भाजप आपल्याला सोबत घायला तयार आहे, असे मी त्यांना सांगितले . माझ्यावर अनेक आमदारांनी विश्वास ठेवला त्यानंतर मी हा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार म्हणाले.

दुधामध्ये भेसळ केली तर त्याला तुरुंगात टाकण्यात येईल..

नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे.आम्ही सप्तश्रृंगी गडाच्या विकासाला काहीही कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही.शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागू नये यासाठी आम्ही विविध योजना सुरु केल्या आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. तसेच जर कोणी भेसळ केली तर त्याला तुरुंगात टाकण्यात येईल . या दुधामध्ये भेसळीमुळे कॅन्सर होत आहेत. वीज वापरा शेतकऱ्यांनो लाईट बिल देऊ नका. आम्ही साडेआठ लाख सोलर पंप देणार आहोत. पुढील पाच वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित दादा पवार म्हणतात मी शब्दाचा पक्का आहे, पण काहीजण माझ्यावर आरोप करतात . काम होणार असेल तर मी हा म्हणतो नाहीतर नाही म्हणतो, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे.एकेकाळी नाशिक जिल्हा बँक एक नंबर होती. परंतु , ती बँक आता अडचणीमध्ये आली आहे. कांदा प्रश्न हा फक्त नाशिकचा नाही. नगर पुणे, सोलापूर, या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते . आम्ही कांदा निर्यांत मूल्य काढून टाका ही मागणी केंद्रात केली आहे.. शेतकऱ्यांना दोन पैसे कधीतरी मिळत असतात. जर कोणी दूध भेसळ केली तर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून जेलमध्ये टाकणार, असे आश्वासन अजित पवारांनी बोलताना दिलं.

Leave a Reply