weather upadate : महाराष्ट्रात मागील २४ तासांत सर्वाधिक तापमान अकोला येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर सर्वात कमी कमाल तापमान महाबळेश्वर येथे ३०.८ अंश सेल्सिअस होते. ही तीव्र उष्णता विदर्भ व मराठवाड्यात अधिक जाणवत आहे, तर कोकणात तापमान तुलनेत सौम्य राहिले.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे होते – पुणे आणि नाशिक येथे कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. लोहगाव येथे तापमान ४१.८ अंश, तर सांगलीत ३६.९ अंश नोंदले गेले. सातारा ३९.२ अंश, सोलापूर ३९.४ अंश, धाराशिव ३९.० अंश, बीड आणि परभणी येथे प्रत्येकी ४१.५ अंश तापमान नोंदले गेले. विदर्भात अकोला ४३.५, अमरावती ४२.४, नागपूर ४२.० आणि चंद्रपूर ४२.६ अंश तापमानासह तापमानात वाढ दिसून आली.
कोकणातील मुंबई कुलाबा ३४.२, सांताक्रुझ ३३.८, डहाणू ३६.३, रत्नागिरी ३२.८ अंश तापमानावर राहिले. गोव्यात पणजी येथे तापमान ३४.९ अंश होते.
राज्यात दिनांक १३ एप्रिलपासून पुढील चार दिवसांत हवामान अंदाज पुढीलप्रमाणे आहे.
कोकण-गोवा विभागात १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ एप्रिलला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ एप्रिल या काळात काही भागांत पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ एप्रिलला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात १३ आणि १४ एप्रिलला मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ एप्रिलला काही भागांत पाऊस पडू शकतो, तर १६ आणि १७ एप्रिलला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भात १३ आणि १४ एप्रिलला मेघगर्जनेसह वाऱ्याच्या झंझावातासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ ते १७ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचे अंदाज आहेत.
राज्यभरात सध्या उन्हाचा तीव्रतेने अनुभव येत असून, अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. अशा वेळी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि शक्यतो बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.












