लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय ,पण पैसे आले नाही , हे करा मग मिळतील पैसे ..

१४ ऑगस्टपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे वर्ग झाले आहेत. मैत्रिणी ,नातेवाइक यांच्या खात्यावर पैसे आले परंतु माझ्या खात्यावर पैसे आले नाही अशा तक्रारी घेऊन महिला बँकेत , सेतू केंद्र येथे गर्दी करत आहेत. पैसे आले नाही याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे बैंक खाते आधारशी लिंक नाही . त्यामुळे सर्वात अगोदर अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घेणे आवश्यक आहे.

अनेक महिलांनी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर घाईगडबडीत अर्ज केला या योजनेचे पैसे येणार की नाहीत, असा संभ्रम असल्यामुळे काही महिलांनी पहिल्यादा याकडे दुर्लक्ष केले.

परंतु , ज्यांनी अर्ज केला, त्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी गर्दी वाढली. ज्यांनी अर्ज केले होते, त्यांना तपासणी नंतर काही दिवसांत अॅप्रूव्ह असा मेसेज आला होता.

ज्या महिल्यांचे वय बसत नाही, त्यांचे अर्ज मंजूर झाले नाही , तर बँक पासबुकवरील खाते क्रमांक अस्पष्ट दिसणे, आधारकार्ड आणि अर्जातील नावात बदल, अशा अर्जदारांना अटी पूर्ततेसाठी संधी देण्यात आली होती.

अर्ज मंजुरीनंतरही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे वर्ग होण्यासाठी आधार बँकेशी लिंक असणे आवश्यक होते. त्यामुळे बँकेशी आधार लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे शासनाने सांगितले आहे .

 ▪️ आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर पैसे.. 

 मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना बैंक खाते नंबर टाकून पासबुक अॅपलोड केले आहे , परंतु ते बँक खाते आधारशी लिक नव्हते, तर दुसरे बँक खाते आधारशी लिंक होते.  त्यामुळे पैसे त्या खात्यावर जमा झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे पहाणे आवश्यक आहे .

 ▪️ पैसे आले नाहीत हे करा..

1.  या योजनेचे बँक खात्यामध्ये पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.

2. तसे नसेल तर महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ महिलांनी आपले ‘बँक सिडिंग’ स्टेटस चेक करावे.

3. बँक खाते व आधार नंबर एकमेकांशी लिंक जर नसेल तर तात्काळ लिंक करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत .

4. बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

5. वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाका व कॅपच्या टाकून लॉगीन करा आणि आधार सिडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल.

Leave a Reply