![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/वारसनोंद-करण्यासाठी-या-ठिकाणी-करा-अर्जजाणून-घ्या-संपूर्ण-माहिती-.webp)
आपल्याला जर सातबारा उताऱ्यामध्ये वारस नोंद करणे असेल, मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करणे असेल, जमिनीवरील बोजा दाखल करणे अथवा कमी करणे आदी फेरफार विषयी सेवा आता ऑनलाईन पद्धतीने ई हक्क प्रणाली द्वारे शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत . नागरिकांना या सुविधेचा लाभ महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्रातून घेता येत आहे. त्यामुळे या सुविधेसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
ऑनलाइन पद्धतीने या सुविधा मिळतात..
आता डिजिटल स्वाक्षरी द्वारे सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . तसेच आता सातबारा उताऱ्यावर फेरफार घेण्याची प्रक्रिया संगणीकृत करण्यात आली आहे अनोंदणीकृत फेरफार म्हणजे सातबारा उतारावरील वारस नोंद करणे, मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करणे, जमिनीवरील बोजा दाखवणे अथवा कमी करणे अपाक शेरा कमी करणे आदी फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकांना महाभुमी या संकेतस्थळावरील ई हक्क प्रणाली मध्ये ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
महा-ई-सेवा केंद्रासाठी दर निश्चित..
नागरिकांच्या अनेक सुविधांसाठी तसेच सातबारा उतारा आणि आठ अ ची प्रत काढण्यासाठी किती दर आकारायचा हे निश्चित नव्हते परंतु शासनाने या सुविधेसाठी दर निश्चित केले असून त्यानुसार 25 रुपये असा दर निश्चित केलेला आहे . अर्जाची कागदपत्रे दोन पेक्षा जास्त पाने असेल तर प्रतिपान दोन रुपये याप्रमाणे दर आकारावेत असे आदेश शासनाने दिले आहेत . शासनाच्या निर्णयामुळे महा-ई-सेवा केंद्र अथवा सेतू केंद्रातून ज्यादा शुल्क करण्याच्या प्रकरणांना आळा बसलेला आहे.