पीएम किसान योजनेच्या लाभापासून ‘या’ तीन कारणांमुळे तुम्हीही वंचित आहात का? या तारखेपर्यंत करा हे काम,मिळेल लाभ

पीएम किसान योजनेच्या लाभापासून 'या' तीन कारणांमुळे तुम्हीही वंचित आहात का? या तारखेपर्यंत करा हे काम,मिळेल लाभ

पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची एक यशस्वी आणि महत्वकांक्षी योजनांपैकी एक असून आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14  हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत.  आपल्याला माहिती आहे.  की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतात.

परंतु बारा लाख शेतकरी पंतप्रधान सन्मान योजने
च्या 14 व्या हप्त्याचा  लाभापासून वंचित राहिलेले आहे.  भूमी अभिलेख नोंदी अपडेट नसणे,  केवायसी नसणे,बँक खात्याला आधार संलग्न आधी त्रुटींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.   प्रधानमंत्री किसान सन्मान लाभापासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी विशेष मोहीम राज्यात 15 ऑगस्ट पासून राबवली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध पत्रात दिलेली आहे.

भूमी अभिलेख अद्यावत, केवायसी, बँक खात्याला आधार कार्ड संलग्न आधी त्रुटीमुळे राज्यातील बारा लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही.  त्यामुळे समितीच्या देखरेखित ग्रामपंचायत तलाठी, आणि कृषी सेवक यांना वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणी तील त्रुटी शोधण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे . अशी माहिती राज्य कृषी खात्याने प्रसिद्ध पत्रात दिली आहे.

 15 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम.. 

या तिन्ही प्रकारच्या नोंदणी आणि अटींची पूर्तता एकत्रित आणि गतीने करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.  वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना शोध घेऊन त्यांच्या तिन्ही अटींची पूर्तता गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवकाकडून करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रात देण्यात आली आहे.

12 लाख शेतकरी पात्र असूनही अभिलेख नोंदणी अद्यावत नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत . राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्रा
च्या योजनेतून वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे आदेश मुंडे यांनी दिलेले आहेत. याबाबत कृषी मंत्री मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.

राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच जे पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून आपले केवायसी व अन्य अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *