शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताय तर या गोष्टीची घ्या काळजी ; प्रशासनाचे आवाहन

शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताय तर घ्या काळजी

काही दिवसातच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागतीची कामे पूर्ण झालेली असून आता त्यांनी बी बियाणे देखील खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे . यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात बी बियाणे खरेदी करताना त्याची गुणवत्ता व दर्जा पाहूनच खरेदी करावेत असे आव्हान नांदेड च्या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केलेले आहे.

बियाणे खते कीटकनाशके खरेदी केल्यावर त्याच्या पावत्या घेणे आवश्यक आहे त्या पावतीवर शेतकऱ्यांची व विक्रेत्याची सही मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि ती पावती पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावी खरेदी केलेल्या बियाणांचे खरेदी पावती, टॅग, पिशवी, वेष्टन,थोडे बियाणे , पिकाची कापणी होईपर्यंत तसेच जपून ठेवावे. बियाणे खरेदी करताना ते सेल बंद आहे की नाही हे चेक करून घेणे. 

बियाणे खरेदी करण्याच्या वेळेस बियाण्यांच्या पाकिटांवरील मुदत तपासून घ्यावी तसेच सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी चेक करून पेरणी करावी जर बियाण्यांच्या वजनामध्ये काही अडचणी किंवा छापील किमतीपेक्षा जर जास्त किमती आकारल्या जात असतील ,तर जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच कीटकनाशकाची खरेदी करण्यापूर्वी अंतिम तारीख चेक करून घ्यावी ,. शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर , विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिलेले असतात तुंमच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना फोनवर संपर्क साधू शकता. असे आव्हान भाग्यश्री भोसले यांनी केलेले आहे.

वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करावेत.

29 जून 2022 रोजी राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबवण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक क्षेत्राचा अर्ज पुढील तपशिला प्रमाणे करावा या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावातील कृषी सहाय्यक, सेतू सुविधा केंद्र ,तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन नांदेड कृषी अधिकारी यांनी भाग्यश्री भोसले यांनी केले आहे . शेततळ्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे . ती जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे तसेचअर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे किंवा सामूहिक शेततळे तसेच भात खाचरातील बोटी किंवा इतर कुठलीही योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *