Ladaki bahin Yojana : लाडक्या बहिणीचे पैसे आता मिळणार नाहीत? जाणून घ्या कारणे…

Ladaki bahin Yojana : महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजना सुरू राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र तरीही या योजनेचे पैसे सरसकट सर्व अर्जदारांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती.

या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आला. एकूण 1 कोटी 6 लाख 69139 महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला. त्यासाठी ११ कोटी २७ लाख अर्ज आले होते.

असे असले तरी सुरुवातीला निवडणुकीच्या आधी पात्र-अपात्र अर्ज न तपासता सरसकट सर्वच महिलांच्या खात्यात प्रत्येकी ७.५ हजार रुपये देण्यात आले. त्यात अनेक महिला या श्रीमंत घरच्या किंवा ज्यांचे उत्पन्न हे ८ लाख, दहा लाख होते अशा होत्या. आता मात्र या योजनेच्या पात्रतेच्या अटींचे निकष लावून पुन्हा एकदा अर्जांची छाननी होणार असून अनेक अपात्र महिला त्यातून बाद होतील, असे संकेत मिळत आहेत.

ज्यांचे उत्पन्न अडीच लाख किंवा आत आहे, ज्यांच्याकडे मोटार-कार नाही, ज्यांचे कुटुंबिय आयकर भरत नाहीत अशाच गरजू महिलांना आता लाडकी बहिण योजना लाभणार आहे. याशिवाय इतरही अटी तपासून मगच योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळतील.

Leave a Reply