सोलापूर, 28 जानेवारी : सोलापूर आणि जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के भाग हा कमी पर्जन्याचा भाग आहे.
त्यामुळे कोरडवाहू शेती करिता वरदान ठरणाऱ्या पाणलोट आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असं आवाहन सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले आहे.
शेततळ्यासाठी असे मिळेल अनुदान:-
– पंधरा बाय पंधरा बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 18 हजार 621 व 20 हजार 235 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 14 हजार 433 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 15 हजार 717 रुपये एवढे अनुदान आहे.
–वीस बाय पंधरा बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 26 हजार 774 व 29 हजार 46 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 21 हजार 539 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 23 हजार 399 रुपये एवढे अनुदान आहे.
–वीस बाय वीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 38 हजार 417 व 41 हजार 623 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 32 हजार 135 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 34 हजार 846 रुपये एवढे अनुदान आहे.
–पंचवीस बाय वीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 50 हजार 61 व 54 हजार 199 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 42 हजार 731 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 46 हजार 293 रुपये एवढे अनुदान आहे.
–पंचवीस बाय पंचवीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 65 हजार 194 व 70 हजार 740 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 56 हजार 818 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 61 हजार 505 रुपये एवढे अनुदान आहे.
–तीस बाय पंचवीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 75 हजार व 75 हजार रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 70 हजार 904 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 75 हजार रुपये एवढे अनुदान आहे.
–वीस बाय वीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 38 हजार 417 व 41 हजार 623 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 32 हजार 135 व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 34 हजार 846 रुपये एवढे अनुदान आहे.
–तीस बाय तीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 75 हजार व 75 हजार रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 75 हजार व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 75 हजार एवढे अनुदान आहे.
–चौतीस बाय चौतीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 75 हजार अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 75 हजार व आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 75 हजार एवढे अनुदान आहे.
कोरडवाहू शेती करिता वरदान ठरणाऱ्या या शेततळ्याच्या संदर्भातील योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच शासनाच्या
अधिकृत महा डीबीडी या पोर्टलवर अर्ज करावेत जर कोणत्या शेतकऱ्याला या संदर्भात अडचण आली तर स्थानिक कृषी अधिकारी
यांच्याकडे संपर्क साधावा आणि आपले अर्ज पूर्ण करावेत, असंही मिसाळ यांनी सांगितले.
Source:- Lokmat