
Kanda bajarbhav : आठवडा संपत आलेला असतानाही लासलगाव आणि पिंपळगाव या सर्वात मोठ्या कांदा बाजारात दर टिकून राहिल्याने आगामी काळात कांदा दर वाढण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
मागील आठवड्यात या दोन्ही बाजारात सरासरी ११५० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर उन्हाळी कांद्याला मिळाला होता. शनिवारपर्यंतच्या आठवड्यात त्यात वाढ झाली आणि आठवडा संपत आल्यानंतर आज शनिवार दिनांक २४ मे रोजी उन्हाळी कांद्याला १२०० रुपये बाजारभाव मिळताना दिसत आहे.
पिंपळगाव बसवंत येथे आज दिनांक २४ मे रोजी सकाळच्या सत्रात कांदा जास्तीत जास्त २ हजार रुपये झालेला आहे. आणि सरासरी १२७५ रुपये प्रति क्विंटल असे मिळाले.
लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला आज सरासरी १२०० रुपये, तर जास्तीत जास्त १६१२ रुपये दर मिळाला. या ठिकाणी आज कमीत कमी दर ६०० रुपये इतका आहे.
दरम्यान राज्यातील महत्त्वाच्या बाजारात पुढीलप्रमाणे कांदा बाजारभाव आज मिळत आहेत. ही सर्व माहिती सकाळच्या सत्रातील लिलावाची आहे.
छत्रपती संभाजीनगर : ६७५
चंद्रपूर-गंजवड: १३५०
कराड: १४००
सांगली: १०००
पुणे-पिंपरी: १२००
पुणे मोशी: ७५०
मंगळवेढा(सोलापूर): १३००
येवला: ८५०
मनमाड: ११००
भुसावळ १०००