Tur bajarbhav : तूर खरेदीसाठी मुदतवाढ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय..

Tur bajarbhav : केंद्र सरकारने तूर डाळीच्या खरेदीसाठी ठरवलेली अंतिम मुदत २८ मे २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० एप्रिल होती, ती नंतर १३ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक शेतकरी आपली तूर विकू शकले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्राने ही निर्णय घेतला आहे.

ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे अजूनही ज्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे पण अजून विक्री करू शकलेले नाहीत, त्यांना आता संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे १.३७ लाख शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून, १३ मेपर्यंत त्यातील ६९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून सुमारे १.०२ लाख मेट्रिक टन तूर खरेदी झाली आहे.

सरकारने तूरीसाठी ७,५५० रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे, जो सध्याच्या बाजारभावापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर थेट सरकारी संस्थांना विकून जास्त भाव मिळण्याची संधी आहे.

राज्यात नाफेड व एनसीसीएफ या संस्थांमार्फत एकूण ८ नोडल एजन्सीजच्या सहाय्याने ७६४ खरेदी केंद्रे सुरू आहेत. ही केंद्रे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत.

ही मुदतवाढ म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे. वेळेअभावी ज्यांची तूर विक्री राहिली होती, त्यांना आता आणखी काही दिवस उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली तूर विकून या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे