Suresh Dhas : सुरेश धस यांना BJP ट्रॅपमध्ये अडकवत आहे ?धस – मुंडे भेटीमुळे भाजप डॅमेज ?

Suresh Dhas

Suresh Dhas : काही दिवसांपूर्वी धस मुंडे यांच्या भेटीची बातमी आली आणि धसांभोवती संशयाचे वातावरण निर्माण झालं मुख्य म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या भेटीचा बॉम्ब फोडल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली त्यामुळे धसांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं पण त्यानंतर सुरेश धसांवर मनोज जरांगे पासून अनेकांनी आरोपांच्या फेरी झाडल्या त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे धस मुंडे भेटीमुळे पुरते फसल्याचं बोललं गेलं पण स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी धसांच्या या मुंडे भेटीची माध्यमांना माहिती दिल्यानं भाजपनच धसांना ट्रॅप मध्ये अडकवलं का धसांना रोखण्यासाठी भाजपनच प्रयत्न सुरू केलेत का अशा चर्चांना उदाहरण आलंय पण यामुळे धसांसोबतच भाजपही डॅमेज होत असल्याचं बोललं जातंय धसांसाठी खरंच भाजपन ट्रॅप लावलाय का तसं असेल तर यामुळे भाजपचही नुकसान कसं होतंय. त्याचीच माहिती या लेखा मधून जाणून घेऊयात  .

संतोष देशमुखांची हत्या ही आकाच्या आदेशाने झाली आहे. असं म्हणत भाजप आमदार सुरेश दसांनी हत्येचा मास्टर वाल्मिक कराड असल्याचं स्पष्ट केलं होतं तसंच आकाचा आका म्हणत मंत्री धनंजय मुंडेंवर या प्रकरणी पहिल्यापासून धसानी निशाणा साधला वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजेच वाल्मिक कराड ते दोघेही एकाच मनाच्या दोन बाजू आहेत.

त्यांची दोस्ती शोले चित्रपटातील जय वीरू सारखी आहे असं सांगून सुरेश धसांनीच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंध जनतेसमोर आणले दुसरीकडं कराडनं सरेंडर केलं इतर आरोपींना अटक झाली त्याचा सर्व श्रेय धसांनी या प्रकरणी फडणवीसांना घेतलेला निर्णयाला दिलं एकीकडे धनंजय मुंडेंवर जोरदार टीका करायची आणि दुसरीकडे फडणवीसांचं कौतुक करायचं असा दोन कलमी कार्यक्रम धसांनी सुरू केला होता. बीड मधल्या एका जाहीर कार्यक्रमात फडणवीसांनी धसांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. त्यामुळे धसांना फडणवीसांनीच बळ दिल्याची चर्चा झाली धसांच्या माध्यमातून फडणवीस मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा प्रभाव कमी करत असल्याचंही सांगितलं गेलं ,त्यातूनच जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेलं आंदोलन धसांच्या मध्यस्थीन सोडवण्यात आलं या सगळ्या घडामोडीतून मराठा समाजात धसांची क्रेज वाढली या सगळ्यात धक्का देणारी बातमी पुढे आली ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाल्याची जशी बातमी आली तसंच धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून अशी कुठलीही भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं मात्र मुंडे धसांच्या भेटीसाठी बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा होती त्यानुसार माध्यमांनी बावनकुळे यांना घेरलं त्यावेळी बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं स्पष्ट केलं सुरेश धस आणि मुंडे यांच्यात माझ्यासमोरच चर्चा झाली साडेचार तास आमच्यात चर्चा झाली काही लपून छपून चर्चा झाली नाही यावेळी त्यांच्यातील मतभेदांवर चर्चा झाली.

या चर्चेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत. त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी दोघांचीही मागणी होती. त्यांच्यामध्ये मनभेद नाही मतभेद आहेत त्यांनी कुठलीही कॉम्प्रोमाईजची भूमिका घेतली नाही या भेटीला महिना झाला असेल असं बावनकुळे यांनी सांगितलं बावनकुळे यांच्या या स्पष्टीकरणाने धसांची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं त्यावर धसांनी बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

त्यांनी जेवण करण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र तिथे धनंजय मुंडे येणार हे मला माहीत नव्हतं ही जुनी गोष्ट आहे. असं स्पष्टीकरण दिलं यासह धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानं त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्याचंही धसानी सांगितलं. त्यातून धस आणि मुंडे यांची दोनदा भेट झाल्याचं पुढे आलं यामुळे धसांवर टिकेची झोड उठली धसांनी मात्र आपण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं जाहीर केलं .तसंच मुंड्यांची भेट घडवून चर्चा करण्यामागं षडयंत्र रचलं या षडयंत्रामागं कोण आहे.

 हे समजलंय असंही धसांनी सांगितलंय हा सगळा घटनाक्रम बघितला तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मुळेच मुंडे धस भेटीच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळालं. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की बावनकुळे त्यांचे बॉस आहेत. असं धस म्हणतात देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅप मध्ये पकडलं का इतकं मोठं प्रकरण सुरू असताना आपण कुणाला भेटतोय याची माहिती नसल्याचंही धस सांगतात मात्र आकाचे आका आले त्याच क्षणी धसांनी बैठकीतून बाहेर पडायला हवं होतं .

याला नैतिकता म्हणतात त्याबाबत सांगायला पाहिजे होतं .पण त्यांची हिंमत आहे का सांगायची असा सवालही रावतांनी केला त्यामुळे धसांना भाजपन जाळ्यात अडकवलं का अशा चर्चा होतात. यामागचं पहिलं कारण म्हणजे सरकारची बदनामी थांबवणं तसं पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांवर अनेक आरोप झालेत त्यातील बहुतांश आरोप हे स्वतः धसांनी केलेत मात्र संबंधित पोलिसांवर ठोस कारवाई झाली नसल्याचं धसांसह मसाजो ग्रामस्थांचं म्हणणं आहे .

पण स्वतः देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री मंत्री असल्यानं पोलिसांच्या या कारभारांचे अप्रत्यक्ष आरोप हे फडणवीसांवरच होत आहेत. त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व पक्ष नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे .मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे .धसांनी यावरून आता युटर्न घेतला असला तरी त्यांनी मुंड्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केलेत धसांनी पीक विमा डीबीटी योजना जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपासह जिल्हा बँकेच्या घोटाळ्यातही मुंड्यांचा हात असल्याचा आरोप केलाय धसांच्या या आरोपांच्या मालिकांनी कुठेतरी सरकार आणि फडणवीस कात्रीत सापडल्याचं दिसतंय .कारण मंत्रिमंडळ विस्तारावेळी अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना सुरुवातीला फोन गेला नव्हता संतोष देशमुख प्रकरणात त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे मुंडेंना मंत्रिपद मिळणार नाही असंच बोललं जात होतं. पण अखेरच्या क्षणी मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन गेला मुंडे मंत्रिमंडळात असावेत यासाठी फडणवीसांनीच आग्रही भूमिका घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या .

एकंदरीतच दसांच्या या आरोपांमुळे मुंडेंसोबत फडणवीसांना ही डॅमेज होत असल्यानं त्यांना रोखण्यासाठी भाजपन हा ट्रॅप लावल्याची चर्चा आहे .आता धसांना भाजपनच ट्रॅप मध्ये अडकवल्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे धसांचे मुंडेंवरचे व्यक्तिगत आरोप धस ज्या मतदारसंघातून निवडून आलेत त्या अष्टीवर धनंजय मुंडेंचा डोळा होता. आष्टीत वाल्मिकी कराडच्या माध्यमातून मुंडे आपली ताकद वाढवू पाहत होते या मतदारसंघातल्या वंजारी समाजाच्या प्राबल्यामुळे मुंड्यांना परळीसह आष्टीतही आपला झेंडा फडकवायचा होता. त्यासाठी स्वतः वाल्मिक कराडनंही आष्टीतून लढण्याची तयारी केली स्थानिक पत्रकार सांगतात मात्र महायुतीत ही जागा भाजपला सुटली आणि धसांना तिकीट मिळालं तसेच काही महिन्यांपूर्वी सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा करच्या सांगण्यावरूनच झाल्याचा संशय धसांना होता .त्याचेही उट्टे धसानी देशमुखांच्या प्रकरणातून काढल्याची चर्चा झाली यामुळे धसांनी केलेले आरोप हे वैयक्तिक सूड भावनेने केल्याचं सांगितलं गेलं.

आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते महायुतीचा भाग आहेत. पण विरोधकांपेक्षा धसच मुंडेंच्या विरोधात जास्त आक्रमक झाल्यानं महायुती सरकारमध्ये चढावड असल्याचं चित्र निर्माण झालं यातून सरकारची होणारी बदनामी थांबवण्यासाठीच धसांना शांत करण्यासाठी भाजपनं त्यांना ट्रॅप केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत .पण यामुळे धसांसोबत भाजपही डॅमेज होताना दिसते धसानी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर धसांवर सर्वात जास्त नाराज झाला तो मराठा समाज मराठा समाजातून धसांवर सध्या जोरदार टीका होऊ लागली आहे .त्यातच धसांची पेरणीस मुळात जरांगेंच महत्व कमी करण्यासाठी झाल्याच्या चर्चांनाही खत पाणी मिळालं याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले मनोज जरांगे पाटील यांचे महत्त्व कमी करण्यासाठी आमदार सुरेश धस यांचा वापर झाला .जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर समाजाप्रती असलेली प्रामाणिक भावना दिसते या सगळ्याला छेद देण्यासाठी सुरेश धस यांचा वापर करण्यात आला .

असं आव्हाड म्हणाले तर संजय राऊत यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धस हा मराठा समाजाचा चेहरा पुढे आणला त्यासाठी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वापर केला मग या प्रकरणात भाजपचा हात आहे का असा खळबळजनक प्रश्न रावतांनी उपस्थित केला तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही धसांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप कडून सुरेश धस यांच्यावर धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी दबाव आणण्यात आला मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी धसांनी भाजप कडून येणाऱ्या दबावा बाबत सांगायला हवं होतं तसं केलं असतं तर मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं असतं .पण सुरेश धसांनी परस्पर धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्यामुळे मराठा समाजाचा धसांवरील विश्वास उडालाय तुमच्या राजकारणासाठी एखाद्या पदासाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता आणि देशमुख कुटुंब मात्र उन्हात पडलंय इकडे तिकडे हिंडायचं असेल तर यामध्ये यायचंच नव्हतं असंही जरांगे यांनी दसांना सुनावलं होतं .

पण त्यांनी भाजपच्या दबावाचा उल्लेख केल्यानं धस मुंडे भेटीतून कुठेतरी भाजपलाही डॅमेज होत. असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे एकंदरीतच मुंडे धस भेटीवरून भाजपन धसांना अडकवल्याच्या चर्चा होत असल्या तर यामध्ये भाजपचही नुकसान होत असल्याचं बोललं जातंय. 

Leave a Reply