Delhi New CM 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला लागला दिल्लीच्या निवडणुकीत भाजपन 70 पैकी 48 जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवलं, तेव्हापासून भाजप दिल्लीत कोणाला मुख्यमंत्री करणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर निकालाच्या 11 दिवसांनी दिल्लीत नवा मुख्यमंत्र्याच्या – नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपन दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्का मोर्तब केलाय भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली आहे.
20 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री पद ची शपथ घेतली . नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा हे उपमुख्यमंत्री पद सांभाळणार आहेत . तर रोहिणीचे आमदार विजेंद्र गुप्ता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार दिल्लीत महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आला होता, संघाने रेखा गुप्ता यांचं नाव पुढे केलं ज्याचं अखेर भाजपन स्वीकार केल्याचं पाहायला मिळतंय. आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत पण दिग्गजांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेला रेखा गुप्ता आहे आहेत कोण? भाजपन दिल्लीत त्यांना मुख्यमंत्री पद का दिलं ? त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणखी कोण होतं ?
रेखा गुप्ता कोण आहेत ते जाणून घेऊया 50 वर्षीय रेखा गुप्ता या शालीमारबाग विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत निवडून आल्यात ,त्यांनी 2025 च्या निवडणुकीत आपच्या वंदना कुमारी यांचा 29595 मतांनी दणदणीत पराभव केला विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार झाल्यात रेखा गुप्ता या पेशानं वकील आहेत. त्यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणा जिल्ह्यातल्या जिंद जिल्ह्यात झाला. त्या दोन वर्षांच्या असताना 1976 मध्ये त्यांचं कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं. रेखा गुप्ता यांनी आपलं संपूर्ण शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. एबीव्हीपी मार्फत त्या राजकारणात आल्या आणि त्यांचा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली रेखा गुप्ता 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या. 2003-04 मध्ये मध्ये दिल्लीच्या भाजप युवा मोर्चाच्या सचिव म्हणून त्यांनी काम केलं 2007 मध्ये त्या उत्तर पितांबुरातून दिल्ली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या ,2012 मध्ये इथूनच त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली रेखा गुप्ता या दिल्ली विद्यापीठाच्या सचिव आणि प्राचार्यही राहिल्यात. मार्च 2010 मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य करण्यात आलं होतं सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. रेखा – गुप्ता 2015 मध्ये त्या भाजपाच्या – तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढल्या त्या निवडणुकीत शालीमार बाग मध्ये – मतदारसंघातून त्यांचा 11000 मतांनी पराभव झाला.
त्यानंतर 2020 मध्ये त्यांचा याच मतदारसंघातून पराभव झाला होता तेव्हा त्यांच्या पराभवाचं अंतर फक्त 3440 मतांचं होतं पण नुकत्याच झालेल्या 2025 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दणदणीत कमबॅक – करत 29595 मतांनी शालिनीमार बाग विधानसभेतून विजय मिळवला . त्यामुळे दोन वेळा हरलेल्या पण पहिल्यांदाच आमदार झालेला रेखा गुप्ता यांच्या गळ्यात भाजपन दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ घातल्यानं त्यांची चांगलीच चर्चा होतीय . आता भाजपनं रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्यामागची कारणं काय ती समजून घेऊयात रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री बनवण्याचं – पहिलं कारण म्हणजे दिल्लीला असलेली महिला मुख्यमंत्र्यांची परंपरा काँग्रेसच्या शीला दीक्षित ह्या 1998 ते 2013 अशी सलग 15 वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यावेळी राजधानीत त्यांची इमेज खूप – चांगली होती. शीला दीक्षित यांच्यापूर्वी – भाजपच्या सुष्मा स्वराज दिल्लीच्या – मुख्यमंत्री होत्या तर 2025 च्या – निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या अतिशी या थोड्या काळासाठी मुख्यमंत्री राहिल्या होत्या म्हणजेच दिल्लीला महिला मुख्यमंत्र्यांची परंपरा असल्याचं दिसून येतं सध्या देशातल्या 18 राज्यात एनडीए ची सत्ता आहे.
पण यापैकी एकाही राज्यात महिला – मुख्यमंत्री नाही तसेच सध्या देशात फक्त पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता दिल्लीत महिला मुख्यमंत्री देऊन भाजप देशभरातील महिला मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातंय . विधानसभा निवडणुकीतही भाजपन दिल्लीच्या महिला मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केला होता. भाजपन महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजना योजनेप्रमाणेच दिल्लीत महिला समृद्धी योजना आणली होती. या योजनेअंतर्गत पक्षाने प्रत्येक महिलेला दरमहा अडीच हजार – रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं या योजनेचा प्रभाव निवडणुकीवर झाला आणि भाजपला महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच आता पक्षाने दिल्लीत रेखा गुप्ता यांच्या रूपात महिला मुख्यमंत्री दिल्याचं सांगितलं जातंय.
रेखा गुप्ता यांना दिल्लीचं मुख्यमंत्री पद देण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे जातीय समीकरण रेखा गुप्ता वैश्य समाजातून येतात दिल्लीत वैश्य समाजाची संख्या सुमारे 8% आहे . हा समाज भाजपचा कोर वोटर मानला जातो. तसेच या समाजात रेखा गुप्ता यांची चांगलीच – लोकप्रियता आहे. त्यामुळे हे मतदार आपल्या – बाजूने भक्कमपणे उभे ठेवण्यासाठी भाजपन रेखा गुप्ता यांची निवड केल्याचं बोललं जातंय याशिवाय रेखा गुप्ता यांचं कुटुंब मूळचं हरियाणाच आहे हरियाणा आणि दिल्ली यांच्या सीमा लागून आहेत .त्यामुळे दिल्लीच्या राजकारणावर बऱ्याचदा हरियाणातल्या राजकारणाचा प्रभाव पाहायला मिळतो. आपचे अरविंद केजरीवाल हे सुद्धा मूळचे हरियाणातच आहेत जे आता विरोधी पक्षात असतील पंजाब मध्ये सत्ता मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचं पुढचं ध्येय हरियाणात सत्ता मिळवण्याचे आहे त्यामुळे भाजपन त्यांना काउंटर करण्यासाठी रेखा गुप्ता यांच्या नावाला पसंती – दिल्याचं राजकीय जाणकार सांगतात रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी निवड होण्यामागचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे राजकारणातली स्वच्छ प्रतिमा आणि संघाचं बॅकग्राऊंड रेखा गुप्ता या बऱ्याच वर्षांपासून भाजप आणि भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाशी जोडलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबाचा संघाशी जुना संबंध आहे. तसंच राजकारणातली त्यांची इमेजही क्लीन आहे. रेखा गुप्ता 25 वर्षांपासून राजकारणात असल्या तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा अजूनपर्यंत एकही आरोप झालेला नाही त्या कोणत्याच वादातही अडकलेल्या नाहीत दिल्लीचा मुख्यमंत्री निवडण्यात हा फॅक्टर महत्त्वाचा होता असंही म्हटलं जातंय कारण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्यामुळे पुढची पाच वर्ष स्वच्छ प्रतिमेचा चेहरा देऊन दिल्लीच्या जनतेला स्थिर सरकार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे रेखा गुप्ता यांच्यासोबत परवेश वर्मा हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते त्यांनी विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी वर्मा यांचीच निवड होईल असंही बोललं जात होतं पण परवेश वर्मा यांच्या विरोधात गेलेली गोष्ट म्हणजे त्यांचे वडील साहेब सिंग वर्मा हे भाजपचे मुख्यमंत्री राहिलेत त्यामुळे जर आता परवेश वर्मा यांना मुख्यमंत्री केलं तर देशभरात भाजपन घराणेशाहीला समर्थन दिल्याचा मेसेज जाण्याची शक्यता होती त्यामुळे त्यांना – उपमुख्यमंत्री पद देऊन मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांची निवड झाल्याचं बोललं जातंय एकूणच काय तर महिला मतदार जातीय समीकरण हरियाणाच बॅकग्राऊंड आणि राजकारणातली क्लीन इमेज या सगळ्या फॅक्टर्स मुळे भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड केल्याचं सांगितलं जातंय आता मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ कसा राहतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं भाजपने दिल्लीच्या – मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड का केली असावी












