Benefits to farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ३१ मार्चपूर्वी पैसे थेट खात्यात; कुणाला होणार लाभ?

Benefits to farmers : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितले की, ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात हा निर्णय समाविष्ट करण्यात आला असून, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परभणी आणि मराठवाड्यातील […]

Tomato, potato cultivation : यंदा टोमॅटो, बटाटा लागवडीत वाढ; हवामान अनुकूल, किडींचाही धोका नाही…

Tomato, potato cultivation : देशभर यंदाच्या रबी हंगामात टोमॅटो, बटाटा आणि कांदा पिकांची लागवड वाढली असून उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर ही पिके घेतली आहेत. त्याचबरोबर हवामानही अनुकूल असून, पिकांवर किडींच्या फारशा तक्रारी नाहीत, त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम किंमतींवर होणार आहे. […]

Rabi planting : रबी हंगामात यंदा देशात विक्रमी लागवड..

Rabi planting : देशभर रबी हंगामात यंदा पिकांची विक्रमी लागवड झाली असून, गहू, तांदूळ, डाळी आणि तेलबियांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. सरकारने ३ मार्च २५ पर्यंतच्या रबी हंगामाच्या जाहीर केलेल्या अहवालानुसार, यावर्षी रबी हंगामात एकूण 661.03 लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली गेली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. गव्हाची लागवड 324.88 लाख हेक्टरवर झाली […]

kanda bajarbhav : कांदा बाजारात चढ-उतार कायम, उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर…

kanda bajarbhav : रंगपंचमीच्या सुटीमुळे अनेक बाजारसमित्यांना सुटी असल्याने कांदा आवक कमी होती. त्यामुळे काही ठिकाणी उन्हाळी कांदा वधारलेला दिसून आला. राज्यात 18 मार्च 2025 रोजी कांदा बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. कांद्याच्या दरात काही बाजार समित्यांमध्ये वाढ झाली, तर काही ठिकाणी किंमती घसरल्या. राज्यभर लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असली, तरी […]

Fishing business : राज्यात आता मासेमारीला मिळणार शेतीचा दर्जा..

Fishing business : राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असून, मासेमारीला शेतीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या अडचणींसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार मनीषा चौधरी, ‘पदुम’चे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव […]

soybean market prices : सोयाबीनचे बाजारभाव या आठवड्यात कसे राहिले? जाणून घ्या..

soybean market prices

soybean market prices : मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सोयाबीनच्या बाजारभावात संमिश्र परिस्थिती पाहायला मिळाली. काही बाजारपेठांमध्ये किंमतींमध्ये किंचित वाढ नोंदवली गेली, तर काही ठिकाणी दर स्थिर राहिले. मागणी आणि पुरवठा यावर आधारित बाजारातील बदल दिसून आले. सोयाबीनचे बाजारभाव १५ मार्च २०२५ पासून १९ मार्च २०२५ पर्यंत चढउतार करत राहिले. सरासरी दर ४०३२ रुपये प्रति क्विंटलच्या आसपास […]

Market price of tur : तुरीचे बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षाही कमी?

Market price of turi : मागील आठवड्यात महाराष्ट्रातील तुरीच्या बाजारभावात काही प्रमाणात चढउतार दिसून आले. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीमुळे काही ठिकाणी किंचित वाढ नोंदवली गेली, तर काही बाजारांमध्ये दर स्थिर राहिले. सरकारने तुरीसाठी किमान आधारभूत किंमत ७२३० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. मागील आठवड्यात तुरीचा बाजारभाव या किमतीच्या जवळपास राहिला. काही ठिकाणी तुरीचे […]

Turmeric market prices : हळदीच्या बाजारभावात चढ-उतार – सांगलीत उच्चांकी दर, मुंबईत स्थिरता..

Turmeric market prices : महाराष्ट्रातील हळदीच्या बाजारभावात मागील आठवड्यात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. काही बाजारपेठांमध्ये दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी मोठी तेजी दिसून आली. विशेषतः सांगली बाजारात राजापुरी हळदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात चढ-उतार झाल्यानंतर किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये हळदीसाठी सरासरी ₹१०,१९८ प्रति क्विंटल असा दर […]

Sorghum, wheat and corn : ज्वारी, गहू आणि मक्याची अशी करा काढणी आणि साठवणूक..

Sorghum, wheat and corn : रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी, मळणी आणि साठवणूक केल्यास पिकांचे नुकसान टाळता येते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. रब्बी ज्वारी रब्बी ज्वारी ११० ते १३० दिवसांत काढणीसाठी तयार होते. ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळसर ठिपके दिसू लागले की काढणी योग्य अवस्थेत […]

Tomato lagvad : उन्हाळी टोमॅटो पुनर्लागवडीसाठी हे उपाय कराच..

Tomato Rate : उन्हाळी टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य पुनर्लागवड पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. टोमॅटो पुनर्लागवडीसाठी शेतात सुरुवातीला सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करावेत. टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवडाभर आधी पाणी देऊन वाफसा स्थितीत ठेवावे. लागवडीच्या दिवशीही वाफ्यांना पाणी देऊन रोपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवडीसाठी निवडलेली रोपे २५ ते ३० दिवसांची, १० ते […]