Tur bajarbhav : तुरीच्या भावाला येणार तरतरी; मार्चपर्यंत असे असतील भाव..

Tur bajarbhav : सध्या लातूर बाजारात लाल तुरीला सरासरी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल, तर पांढऱ्या तुरीलाही साधारण तितकेच बाजारभाव मिळत आहेत. शेतकऱ्यांना तूरीचे बाजारभाव वाढतील का याची प्रतिक्षा आहे. दरम्यान जानेवारी ते मार्चपर्यंतच्या काळात तुरीचे संभाव्य बाजारभाव कसे असतील ते जाणून घेऊ या. भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. […]

kanda bajarbhav : संक्रांतीपर्यंत कांदा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या…

kanda bajarbhav : शेतकरी मित्रांनो नमस्कार, खरीपाचा कांदा संपून अनेकांचा लेट खरीप कांदा आता बाजारात येत आहे. त्यामुळेच की काय या आठवड्यात नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा आवक वाढली आहे. ती कितीने वाढावी, तर सोमवारी बाजार सुरू झाले, तेव्हा तब्बल सव्वा चार लाख क्विंटल आवक झाली. पण एक सोमवारी बाजारावर काहीही फरक पडला नाही आणि लासलगाव […]

Maharashtra Weather: या आठवड्यात कशी राहणार थंडीची चाल?

शुक्रवार दि. १० जानेवारीपर्यंत माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण व  महाराष्ट्रात जाणवेल. काल मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली जाणवले असुन मुंबई सांताक्रूझ येथे तर किमान तापमान सरासरीच्या २ डिग्री खालावून १५.२ डिग्री.से. ग्रेड होते. शनिवार दि.११ जानेवारीपासून मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र […]

Godavari Canal : गोदावरी कालव्यातून रब्बी आणि उन्हाळीसाठी किती आवर्तने मिळणार

Godavari Canal : नगर जिल्हयातील राहाता येथे गोदावरी डावा व उजवा कालवे सल्लागार समितीची बैठक झाली. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, आदी उपस्थित होते. […]

HMPV : पुन्हा लॉकडाऊन ? एचएमपीव्ही साथीबाबत महत्त्वाची माहिती..

HMPV कोरोनाच्या साथीनंतर चीन आणि शेजारील देशात श्वसनाच्या आजाराचे HMPV चे रुग्ण आढळले असून सध्या जोरदार साथ सुरू आहे. भारतातही काही शहरात या साथीचे रुग्ण सापल्याने पुन्हा लॉकडाऊनची भीती देश वासियांमध्ये आहे. अशात केंद्र सरकारने एक महत्त्वाचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत […]

Soybean Bajarbhav: सोयाबीनच्या किंमतीसाठी कसा होता आठवडा?

Soybean Bajarbhav:  सध्या सोयाबीनच्या किंमती हमीभावापेक्षा कमी आहेत. असे असले तरी दोन आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात सोयाबीनच्या किंमतीत बदल झालेला दिसून येत आहे. बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन साप्ताहिक किंमती दि. ५ जानेवारी २०२५ अखेर : रु. ४१७१ प्रती क्विंटल अशा राहिल्यात. मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. […]

kanda bajarbhav : मागील सप्ताहात कशी राहिली कांद्याची चाल..

kanda bajarbhav : शेतकरी मित्रांनो नमस्कार, कांदा उत्पादन घेताना आपल्याला नेहमीच कांद्याच्या बाजारभावाची काळची आणि उत्सुकता असते. त्यासाठीच तुम्ही बाजारभाव आणि त्याचे विश्लेषण वाचत असतात. अनेकांना कृषी २४च्या कांदा बाजारभावाच्या आणि विश्लेषणाच्या बातम्यांचीही प्रतीक्षा असते. म्हणूनच आज आम्ही या आठवड्यात कांदा बाजारभाव विश्लेषण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मागच्या आठवड्यात कांदयाचे साप्ताहिक बाजारभाव कसे होते? त्यात […]

Palm plantation : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनमुळे देशात वाढतेय पाम लागवड..

Palm plantation : सध्या देशाची खाद्यतेला गरज भागविण्यासाठी आपल्याला बाहेरून पामतेल, तसेच सोयाबीन तेल आयात करावे लागत आहे. मात्र भविष्यात येथील शेतकऱ्यांनाच प्रोत्साहन दिले, तर पामतेल भारतातही तयार होऊ शकते यासाठी केंद्राचा प्रयत्न सुरू असून विशेष योजनेअंतर्गत काही राज्यात पाम शेतीची मुळे रूजू लागली आहेत. दरम्यान अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान […]

Dhananjay munde : बीड खून प्रकरणी अजितदादांनी धनंजय मुंडेंना पाठीशी का घातले?

Dhananjay munde: सध्या बीड खूनाचा विषय सगळीकडेच गाजत असताना या खूनाशी अप्रत्यक्षपणे ज्यांचे नाव जोडले जातेय, ते म्हणजे राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध असलेला संशयित सूत्रधार वाल्मिक कराड हा मंत्री मुंडे यांचा जवळचा आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक […]

toll : राज्यात १ एप्रिलपासून टोलसंदर्भात होणार हा मोठा बदल…

toll: राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून […]