kanda bajarbhav : संक्रांतीपर्यंत कांदा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या…

kanda bajarbhav : शेतकरी मित्रांनो नमस्कार, खरीपाचा कांदा संपून अनेकांचा लेट खरीप कांदा आता बाजारात येत आहे. त्यामुळेच की काय या आठवड्यात नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा आवक वाढली आहे. ती कितीने वाढावी, तर सोमवारी बाजार सुरू झाले, तेव्हा तब्बल सव्वा चार लाख क्विंटल आवक झाली. पण एक सोमवारी बाजारावर काहीही फरक पडला नाही आणि लासलगाव बाजारात कांद्याचे भाव शनिवार इतकेच म्हणजेच सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल टिकून राहिले.

आता तुम्हाला प्रत्येकाला काळजी आणि उत्सुकता आहे की येणाऱ्या काळात म्हणजेच हा संपूर्ण आठवडा आणि पुढील आठवडा संक्रांतीपर्यंत बाजारभाव कसे असतील, ते वाढतील की घसरतील. तेच सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत.

तर बांधवानो, ९ डिसेंबर रोजी जे बाजारभाव होते, ते नंतर कोसळले. कितीने कोसळावे, तर तब्बल ५० ते ६० टक्के. म्हणजे ४ हजारावरून थेट १५०० रुपयांवर आले ना राव. त्यात आपल्या कांदा उत्पादकांचं खूप म्हणजे तब्बल ६०० कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झालं. पण तीन आठवडे झालेत कांदा मार्केट पुन्हा बहरू लागलं असून भाव २ हजाराच्या पुढेच आहेत.

आता तुम्हाला जी शंका आहे की संक्रांतीपर्यंत म्हणजेच अजून पुढच्या मंगळवार-बुधवारपर्यंत कांद्याचे बाजारभाव कसे राहतील. तर त्यासाठी आम्ही पिंपळगाव आणि लासलगावच्या व्यापारी व बाजारसमितीच्या अनुभवी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात म्हणजेच पुढील आठवडाभर हे बाजारभाव टिकून राहतील.

याचे कारण म्हणजे राज्यात जरी आवक वाढली, तरी देशपातळीवरील आवक घटली आहे. राजस्थानचा कांदा संपला आहे, गुजरातचा कांदा जवळपास संपत आला आहे. सध्या उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातून आवक जास्त होताना दिसत असली, तरी ती सरासरी दीड ते ४ हजार टन प्रति दिन अशीच आहे. म्हणजे लासलगाव किंवा पिंपळगाव किंवा पुणे बाजारातील एक दिवसाची आवक फार तर.

म्हणूनच सध्या देशाची मदार आपल्या महाराष्ट्राच्याच्य कांद्यावर आहे. त्यात निर्यातही सुरू आहे. शिवाय मागच्या वर्षीसारखी कुठलीही निर्यात बंदी नाही. त्यामुळे संक्रांतीपर्यंत भाव टिकून राहतील. निदान दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या खाली तरी जाणार नाही (हे लासलगाव बाजारासाठी संदर्भ घेऊन सांगितले आहे.) हे तुम्ही ध्यानात घ्या आणि बिनधास्त राहा.

फक्त एक मात्र काळजी घ्यायची आहे. कुठेही बाजारसमितीत पाच पन्नास जास्त मिळत असले तरी एकदम कांदा विक्रीला नेऊन गर्दी करू नका, टप्प्या टप्प्याने विका, नाहीतर गर्दी वाढली की बाजारभाव कमी होतील आणि तुमचेच नुकसान होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *