राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान होत आहे शुक्रवारपासून काही भागात पाऊस पडू शकतो त्यानंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.
राज्यात दोन दिवसापासून काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे तर हवेतील गारवा ही कमी झाला आहे राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे.
शुक्रवारी मात्र पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे शुक्रवारी कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी तिचा आणि ढगांच्या गडगटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव व लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तर नाशिक बीड आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
शनिवारी संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र खानदेशातील धुळे आणि नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजय आणि ढगांच्या गडगडासह हलक्या मध्यम स्वरूपाचा अंदाज हवामान विभागणी दिला तसेच जळगाव परभणी हिंगोली, नांदेड या ठिकाणीही हलक्यासरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मर्यादित क्षेत्रात रब्बीतील ज्वारी, हरभरा पिकांना वरदान ठरू शकणाऱ्या मध्यम पावसाची शक्यता जाणवते असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले . थंडीचा जोर वाढल्यास त्याचा रब्बी हंगामातील पिकांना चांगला फायदा होणार आहे . पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशाकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा धोका नाही आणि त्यापासून पाऊस होण्याची शक्यता नाही. सध्या एल निनो तीव्रतेत आहे . मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे.
असे राहील किमान तापमान
येत्या तीस नोव्हेंबर पर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. खानदेशात थंडीचे प्रमाण अधिक असेल, सध्या तरी किमान तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत असून पुण्यात किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.