अर्थमंत्र्यांची माहिती ; ८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात…

अर्थमंत्र्यांची माहिती ; ८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात,

 शेतकऱ्यांना या दोन ते तीन महिन्यांमध्ये अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यांच्या पिकाची नासाडी झाली असून फळबागा देखील जमीनदोस्त झाल्या आहे. यामुळे  शेतकऱ्याने शेतीतील केलेला खर्च देखील निघालेला नाही. 

यामुळे मंत्रालयातून शेतकऱ्यांना  लवकरात लवकर मदत देण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना  दिलासा मिळालेला असून, मागच्या आठवड्यामध्ये सरकारकडे नुकसानीचे पैसे जमा झालेले आहेत .ते नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आठ ते नऊ दिवसांमध्ये जमा करण्यात येतील ,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची कामे जलद गतीने करा याचबरोबर गाळयुक्त शिवाय योजना योग्य प्रकारे राबवण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत. 

 आता सरकारने एक नवीन पद्धत सुरू केलेली आहे. यामध्ये आपत्ती झाल्यानंतर पिकाचे पंचनामे करून निधी मागणी अहवाल तयार करून तो संबंधित यंत्रणेमार्फत सरकारला पाठवण्यात येईल .त्यानंतर सरकारचा निर्णय जाहीर होऊन तो ऑनलाइन निधी वितरण प्रणाली समाविष्ट केला जाईल.

नुकसान झालेले शेतकरी ची माहिती त्यामध्ये अपलोड झाल्यानंतर सरकार त्याच्या बँक खात्यात थेट मंत्रालयातून पैसे जमा करण्याची अंमलबजावणी करेल. या सरकारच्या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *