अवकाळी पाऊस राज्यातील काही भागांमध्ये कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळाने वर्तवलेला आहे. 31 मे पर्यंत कोकण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस असणार आहे. तापमानाचा पारा काही राज्यातील शहरांमध्ये चाळीस अंशापर्यंत घसरलेला आहे, त्यामुळे उकाडा कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
मान्सूनला आता अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना मान्सूनबाबत दिलासा मिळालेला आहे. मान्सून आता येत्या दोन दिवसात अंदमान निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे. राजस्थान ते मध्य प्रदेश पर्यंत मान्सूनची चक्रीय स्थिती तयार झालेली असून दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या सर्व स्थितीवरूनच राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे.
दक्षिण भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे ,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला ,तसेच राज्यातील जवळ जवळ सर्वच भागांमध्ये विजांच्या कडकडासह, मेघ गर्जनासह पाऊस हजेरी लावणार आहे.
आयएमडी च्या अंदाजानुसार याठिकाणी आज पावसाची शक्यता ;
हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात मध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर ,सिंधुदुर्ग, उस्मानाबाद , सातारा, औरंगाबाद, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, सांगली, जालना, बीड, नांदेड, या ठिकाणी पाऊसाची शक्यता .
4 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितला आहे. या वर्षीचा मान्सून सामान्य असणार आहे.तसेच हवामान अंदाजानुसार पूरजन्य किंवा अति मुसळधार परिस्थिती निर्माण होईल असे आता तरी वाटत नाही. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 % पर्जन्यमान अपेक्षित आहे. यापेक्षा 4 % कमी किंवा जास्त या सरासरीच्या तुलनेत होण्याची शक्यता आहे.