लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर …

योजनेचे नाव : लाडकी बहीण योजना

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

➡️अँप डाउनलोड झाल्यानंतर सर्वात अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे .
➡️ जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
➡️अँप मध्ये गेल्यानंतर सर्वात खाली चार मेनू तुम्हाला दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लीक करावे.
➡️ क्लिक केल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑपशन वर क्लीक करावे .
➡️ फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी
➡️ माहिती भरताना जन्म झाल्याचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थितरित्या तिथे भरावी .
➡️ त्यानंतर सर्व माहिती स्टेप बाय स्टेप ने न चुकता माहिती भरावी.➡️ सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना –
आधार कार्ड मध्ये आधार कार्ड
अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)
➡️ उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
➡️ हमीपत्र
➡️ बँक पासबुक
➡️ सध्याचा LIVE फोटो
वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
➡️ त्यानंतर खाली Accept करावे
➡️ माहिती जतन करा वर क्लिक करा
➡️ यानंतर थोडा वेळ थांबा तुम्ही टाकलेल्या मोबाईल वरती OTP येईल.
➡️ 4 अंकी OTP टाका
➡️ फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.
➡️ तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर अर्ज या टॅब वर क्लीक करावे .
➡️ यावरून तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणून घेता येईल . यानंतर तुम्हाला Scheme: pending मध्ये तुमचा अर्ज दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *