खाजगी व सहकारी संघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाला किमान 34 रुपये दर देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत .21 जुलैपासून हे दर देणे दूध संघांना बंधनकारक राहतील.
दुधाचे भाव निश्चित करण्यासाठी दूध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने शिफारस केल्याप्रमाणे आता 3.5 / 8.5 गुण प्रतीच्या दुधात 34 रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे.
गाईच्या दुधामध्ये वारंवार कपाती च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली होती .या बैठकीमध्ये किमान 35 रुपये दर देणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते. परंतु काही दूध संघांनी त्याबाबत असमर्थता दर्शवली होती. या सर्व बाबी विचारात घेऊन दूध व्यवसाय विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
या समितीत महाराष्ट्र राज्य ,सहकारी दूध महासंघाच्या चेअरमन, राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे प्रतिनिधी, सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी, तसेच जळगाव आणि वारणा दूध संघाचे प्रतिनिधी, तसेच चितळे डेअरी इंदापूर डेरी अँड मिल्क ,ऊर्जा मिल्क अँड मिल्क प्रतिनिधींचा समावेश होता. तसेच दूध व्यवसाय आयुक्त. कार्यालयातील उपयुक्त या समितीचे सदस्य सचिव होते .या समितीची बैठक होऊन त्यामध्ये 3.5 ते 8.5 गुणप्रतीच्या दुधास ३४ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
हा दर बिना कपात दूध उत्पादकांना देणे बंधनकारक आहे. हा नवा दर 21 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने तर तीन महिने दूध किमान दूध खरेदी दर निश्चितीची शिफारस राज्य सरकारला करायची आहे.